Viral Video Today: असं म्हणतात वाचावं तर असं वाचावं की उद्याचा दिवस आपल्याला जिंकायचा आहे आणि नाचावं तर असं नाचावं की उद्याचा दिवसच येणार नाही आहे. आणि हाच फंडा एका व्हायरल व्हिडिओमधील आजींना महिलेला परफेक्ट कळला आहे. एका पंजाबी लग्नातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे यात एक महिला बेभान नाचताना दिसत आहे, या महिलेचा उत्साह पाहून आम्हालाही थिरकण्याची इच्छा होत आहे असे नेटकऱ्यांनी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे. या व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून याला १० लाखाहून अधिक व्ह्यूज आहेत तर १ लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. पण असं एवढं या व्हिडिओमध्ये आहे तरी काय, चला तर पाहुयात..

‘ढोल जगेरो दा’ या लोकप्रिय पंजाबी गाण्यावर एका वयस्कर महिलेचा नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या महिलेने सुंदर लाल साडी परिधान केली आहे. या महिलेचा उत्साह पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत. केवळ उत्साहच नव्हे तर ज्याप्रकारे त्यांनी व्हिडिओमध्ये भांगड्याच्या स्टेप्स केल्या आहेत त्या एखाद्या प्रोफेशनल डान्सरलाही भारी पडतील अशा आहेत. अनेकांनी त्यांच्या या भन्नाट स्टेप्सचेही कौतुक केले आहे.

@shailarmy यांनी इंस्टाग्राम वर शेअर केलेल्या या व्हिडीओत नृत्य करणाऱ्या महिलेचे नाव रेखा बजाज असे असल्याचे समजत आहे, रेखा यांनी या व्हायरल व्हिडिओवर स्वतः कमेंट करून कौतुक करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच अगदी शेवटच्या गाण्यापर्यंत नाचण्यात मज्जा आली असेही त्यांनी म्हणाले आहे. रेखा यांच्या ऊर्जेचं सर्वांनीच कौतुक केलं आहे.

नाचावं तर असं नाहीतर..

Video: होम मिनिस्टरमध्ये आजींचा रॅम्प वॉक झाला Viral; ‘फ्लायिंग किस’ पोझ द्यायला गेल्या अन पार..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान , व्हायरल व्हिडीओमधील रेखा यांचा आत्मविश्वास, उर्जा, आनंद व प्रेम पाहून अनेकांनी प्रशंसा केली आहे. रेखा यांच्यासारखंच आपल्यालाही बिनधास्त व मनसोक्त नाचता यावं अशी इच्छाही अनेकांनी व्यक्त केली आहे. तुम्हाला रेखा यांचा हा व्हिडीओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.