Viral Video Farmer Rescuing Bull Trapped Across The River : शेतकरी आणि प्राणी यांच्यातील नातं जगावेगळं असतं. शेतकरी शेतात दिवसरात्र राबत असतो आणि त्याला मदत करण्यासाठी त्याचा पाळीव प्राणी त्याच्याबरोबर असतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पाळीव प्राणी नेहमीच त्याच्या आपलुकीचा विषय असतो. तर अशाच एका शेतकऱ्याचा आणि त्याच्या पाळीव प्राण्याच्या भावूक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे; यामध्ये मुक्या जीवाला वाचवण्यासाठी धडपड सुरु आहे.
व्हिडीओ कुठल्या गावचा आहे याबद्दल अद्याप माहिती कळू शकलेली नाही. पण, नदीपलीकडे असणाऱ्या मुक्या प्राण्याला वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरु आहे. क्रेनला कापड बांधून आणि शेतकरी हातात चारा घेऊन जेसीबीच्या सहाय्याने पलीकडे जातो. शेतकरी पाळीव प्राण्याला चारा देऊन क्रेनपर्यंत घेऊन येतो. त्यानंतर सगळे मिळून बैल क्रेनला कापडाने बांधतात आणि विरुद्ध दिशेला घेऊन येतात.
मुका जीव वाचवण्यासाठी धडपड (Viral Video)
शेतकरी शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असला तरीही शेतीला पूरक म्हणून पशुपालन हा व्यवसाय प्राधान्याने करावाच लागतो. त्यामध्ये गाईचाही समावेश असतो. दुग्धोत्पादनासाठी गाईला अनेक ठिकाणी प्रथम स्थान दिले जाते. गाईचे दूध शेतकरी विकून आपल्या पोटा-पाण्याचा खर्च भागवतात. तर बैल शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून वर्षभर शेतात राबत असतो. त्यामुळे शेतकऱ्याचा बैलावर अगदी पोटच्या मुलाप्रमाणे किंवा त्याच्यापेक्षा जास्त जीव असतो. त्यामुळे मुक्या प्रांण्यांना एकटं सोडणे किंवा त्यांच्यापासून दूर जाणे प्रत्येक शेतकऱ्यासाठी कठीण जाते.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @archana_gaonkar_photography या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “मुका जीव वाचवण्यासाठी धडपड, काय वेळ आली बघवत नाही” ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा भारावून गेले आहेत आणि “डोळ्यात पाणी आले. देवा सर्वांना सुखाने ठेव आणि पाऊस थांबू दे”, “किती लाजिरवाणी आणि दुःखद गोष्ट आहे ही”, “खुप छान काम केल देवाचे आर्शीवाद तुमच्या पाठीशी कायम राहील” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत…