School Boy Rain Dance Viral: लहानग्यांचं बालपण म्हणजे निरागसतेचा आणि उत्साहाचा खजिना. अनेक मुलं अगदी लहान वयातच आपली कला, छंद आणि आवड ओळखतात आणि त्यात मनापासून रमता-रमता पुढे जातात. काहींच्या नृत्यकलेतून त्यांची उमलती स्वप्नं दिसतात, तर काहींच्या गोड गाण्यातून त्यांची प्रतिभा प्रकटते. सोशल मीडियाच्या या युगात अशा लहानग्यांचे व्हिडीओ पाहून आपण थक्क होतो.

सध्या असाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ प्रचंड गाजतोय. त्याची डान्समधली लय, चेहऱ्यावरचे भाव आणि त्याच्या आत्मविश्वासाने भारलेल्या स्टेप्स पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही वाटेल एवढ्या लहान वयात इतके परफेक्शन कसे काय शक्य आहे? या छोट्या डान्सरचं कौशल्य आणि त्याचा आत्मविश्वास इतका अप्रतिम आहे की, तो भविष्यात मोठं नाव कमावणार याबाबत नेटकऱ्यांमध्ये कोणतीही शंका नाही.

पाऊस म्हटलं की डबक्यांमध्ये उड्या, कागदी होड्या आणि भिजण्याची मजा पण या सगळ्यापलीकडे सोशल मीडियावर सध्या एका छोट्या मुलाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. कारण शाळेचा ड्रेस घालून पावसात नाचताना त्याने असे मूव्हज दाखवले की पाहणाऱ्यांनी अक्षरशः डोकं धरलं.

हा व्हिडीओ ‘हेरा फेरी’ या सुपरहिट चित्रपटातील लोकप्रिय गाणं “जब भी कोई हसीना”वरचा आहे. विशेष म्हणजे हे गाणं ज्या दमदार अंदाजात अक्षय कुमारने पडद्यावर सादर केलं होतं, त्याच आत्मविश्वासाने हा लहानगा पावसात थिरकताना दिसतो. इन्स्टाग्रामवर ऋषी कश्यप (@rish_0104) नावाच्या अकाउंटवरून ही क्लिप शेअर करण्यात आली असून, कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “पावसात डान्स करण्याची वेगळीच मजा आहे.”

फक्त काही दिवसांतच या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. ३० लाखांहून अधिक व्ह्युज मिळालेल्या या क्लिपमध्ये पावसाचे थेंब आणि गाण्याचा ठेका यांचा जबरदस्त संगम दिसतो. त्या लहानग्याच्या स्टेप्समध्ये जी एनर्जी आहे, जो आत्मविश्वास आहे, ते पाहून प्रेक्षकांनीही थक्क होऊन भरभरून दाद दिली आहे.

एकाने कमेंट केली, “खूप सुंदर मूव्हज!” तर दुसऱ्याने लिहिलं, “हा मुलगा खरंच सुंदर डान्सर आहे.” काहींनी तर मजेत म्हटलं, “हा तर चुकीच्या पिढीत जन्माला आला आहे.” तर अनेकांनी त्याच्या टॅलेंटचं कौतुक करत प्रोत्साहनही दिलं “तुझी मेहनत आणि कला नक्कीच रंग आणेल.”

हा पहिलाच प्रकार नाही, याआधीही मुलांच्या डान्स व्हिडीओंनी सोशल मीडियावर वादळ आणलं आहे. काही दिवसांपूर्वीच एका लहान मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, जिथे ती आपल्या आई-वडिलांना ‘छम छम’ या हिट गाण्याचे स्टेप्स शिकवत होती.

पण, या वेळची क्लिप खरोखर वेगळीच आहे, कारण हा पावसाचा रोमँटिक अंदाज आणि त्यात एक छोटा डान्सर जणू काही स्वप्नासारखं कॉम्बिनेशन!

येथे पाहा व्हिडीओ

लोक आता उत्सुकतेने विचारतायत – “या मुलाचा पुढचा डान्स व्हिडीओ केव्हा येतोय?”