सोशल मीडियावर सध्या एक मजेदार आणि गोड व्हिडीओ व्हायरल होत आहे. शाळेतील वर्गात एका मुला-मुलींमधील ही छोटीशी घटना लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणत आहे. काहींनी व्हिडीओवर जर हे आमच्या काळात घडले असते तर काय झाले असते?” अशा मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हा व्हिडीओ एका शाळेतील छोट्या प्रसंगावर आधारित आहे. एका विद्यार्थ्याने मोठा पुष्पगुच्छ घेऊन वर्गात प्रवेश केला. पण, थेट वर्गात जाण्याऐवजी त्याने प्रथम शिक्षकांची परवानगी मागितली. परवानगी मिळाल्यानंतर तो वर्गात शांतपणे प्रवेश करतो आणि एका बाकावर बसलेल्या विद्यार्थिनीकडे हळूहळू जातो. सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे खिळल्या असतात.

व्हिडीओमध्ये विद्यार्थी अतिशय विनम्रतेने आणि आदराने विद्यार्थिनीकडे जातो आणि तिला पुष्पगुच्छ देतो. त्या क्षणी वर्गात हास्य आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते. इतर विद्यार्थी टाळ्या वाजवतात, ओरडतात आणि वातावरण खूप उत्साही होते. विद्यार्थी लाजून हसतो आणि हे दृश्य प्रेक्षकांच्या मनात एक गोड भावना निर्माण करते. विद्यार्थ्याच्या या निष्पाप धाडसाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने केलेली ही कृती कोणत्याही अतिशयोक्तीशिवाय शालीनतेने सादर केली आहे. कदाचित हेच या व्हिडीओचे आकर्षण आहे.

पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आणि काही तासांतच हजारो लोकांनी तो पाहिला आणि शेअर केला. त्याला लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळत आहेत. तथापि, प्रतिक्रिया संमिश्र आहेत. काहींना हा व्हिडीओ एआय-जनरेटेड वाटतो, तर काहींना त्यांचे शाळेचे दिवस आठवतात. एका युजरने मजेशीर प्रतिक्रिया दिली – “आमच्या टाइमला अशी शाळा कुठे होती?” दुसऱ्याने लिहिलं, “मी बाबांना या शाळेत ॲडमिशन घेण्यासाठी सांगितलं होतं, पण त्यांनी घेतलंच नाही.” तिसरा युजर म्हणतो, “आमच्या काळात हा सिलेबसच नव्हता!” काहींनी मात्र टोमणा मारत लिहिलं – “आता शाळांमध्ये अभ्यास शिकवतं नाही का?”

हा छोटासा व्हिडीओ केवळ एक मजेशीर क्षण नसून, बदलत्या काळाचंही प्रतीक आहे. आजच्या पिढीचं एक्स्प्रेशन, आत्मविश्वास आणि मोकळेपणाचं हे चित्र लोकांना भावतंय. शाळेतील हा छोटासा ‘रोमॅंटिक’ प्रसंग इंटरनेटवर धमाल उडवतोय आणि लोकांना पुन्हा एकदा त्यांच्या निरागस शालेय दिवसांची आठवण करून देतोय.