Viral Video: संस्कार म्हणजे शिस्त, थोरमोठ्यांचा आदर, संस्कार म्हणजे माणुसकी, परोपकारी. असं म्हणतात, मुलांना चांगले संस्कार देणे हे आईवडीलांच्या हातात असते. चांगले संस्कार मिळालेले मुले आयुष्यात पुढे चांगली व्यक्ती होतात. त्यांना लोक त्यांच्या माणुसकीमुळे ओळखतात. ते इतरांना मदत करायला नेहमी धावतात. इतरांबरोबर प्रेमाने व आदराने वागतात. सोशल मीडियावर माणुसकी व संस्कार दर्शवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मिडीयावर अनेकजण व्हिडीओ शेअर करीत असतात. त्यात अनेक व्हिडीओ मजेशीर असतात अनेक व्हिडीओतून आपल्यालाही शिकायला मिळत असते. हा व्हिडीओ म्हणजे संस्कार का महत्त्वाचे असतात त्याचे उत्तम उदाहरण आहे. ट्रेनमधील प्रवासादरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी रील्सचे, कधी भांडणाचे, तर बसण्यासाठी केलेल्या जुगाडचे व्हिडीओ व्हायरल केले जातात. याशिवाय ट्रेनमधील अपघाताचे व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. पण, सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, शिक्षण ही जीवनाची एक मौल्यवान भेट आहे आणि संस्कार जीवनाचे सार आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लोकलमध्ये प्रचंड गर्दी दिसत आहे. नीट उभं राहायलाही जागा दिसत नाहीये. याच गर्दीत एक महिला तिच्या लहान बाळाला घेऊन उभी असलेली दिसत आहे. यावेळी या महिलेला जागा देणं अपेक्षित आहे मात्र कुणीही जागेवरून उठून सीट देत नाहीये. यावेळी एका तरुणाचं या महिलेकडे लक्ष जातं आणि हा तरुण क्षणाच उठून महिलेला बसायला त्याची सीट देतो. ती महिलाही सीटवर बाळाला घेऊन व्यवस्थित बसताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ lay_bhari_official नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये, “माणूस नुसता शिकून मोठा होत नाही तर त्याला संस्काराचीही जोड असावी लागते” यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं प्रतिक्रिया दिली आहे की, “धन्य तुझे आई वडील” तर आणखी एकानं संस्कार खूप महत्त्वाचे असतात अशी प्रतिक्रिया दिली आहे.