Little Girl Ganpati Dance: नुकतीच श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून, सगळीकडे भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. श्रावण संपताच भाद्रपद महिन्याच्या सुरुवातीला गणपती बाप्पाचे आगमन होईल. गेल्या वर्षभरापासून बाप्पाचे भक्त बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत असतात. बाप्पाची मूर्ती कशी असायला हवी? आरास कशी असायला हवी? या सगळ्याची अनेक महिन्यांपासून तयारी केली जाते. सध्या घरोघरी, सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

गणेश चतुर्शीच्या काळात सोशल मीडियावर विविध सुंदर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. त्यात कधी गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती, सजावटीचे व्हिडीओ, प्रसाद अशा विविध गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर गणपतीच्या आगमनाच्या जल्लोषाचेदेखील अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक जुना व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही आनंदी व्हाल.

बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष (Little Girl Ganpati Dance)

गणपती बाप्पा हा लहान मुलांचा आवडता देव आहे. बाप्पाच्या मनमोहक निरागस रूपाची भुरळ लहान मुलांनाही सहज पडते. त्यामुळे बाप्पाच्या आगमनाचा आनंद मोठ्यांइतकाच लहानांमध्येही पाहायला मिळतो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका घरामध्ये बाप्पाच्या मूर्तीचे आगमन झाले आहे आणि एक चिमुकली ढोल-ताशाच्या तालावर नाचताना दिसत आहे. चिमुकलीचा हा डान्स पाहून अनेकांना बाप्पाच्या आगमनाची ओढ लागली आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये, “आतुरता तुझ्या आगमनाची…” असं लिहिलं आहे.”

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @marathi_old_athavani या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच यावर आतापर्यंत चार लाखांहून अधिक व्ह्युज आणि ४० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स त्यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘मृत्यूचे सावट कधीही…’ सांस्कृतिक कार्यक्रमात ट्रान्सजेंडरसह डान्स करताना शिक्षकाबरोबर झालं असं काही… VIDEO पाहून उडेल थरकाप

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने लिहिलंय, “खूपच क्यूट आहे ही मुलगी.” दुसऱ्या युजरने लिहिलंय, “व्वा! किती भारी नाचतेय ही.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “आनंद गगनात हिच्या मावेना.” चौथ्या युजरनं लिहिलंय, “आता फक्त काहीच दिवस बाकी.”