Video Shows Elderly man Walk 2000 kilometers To Reach Kedarnath : भाविकांसाठी केदारनाथ धामचे दरवाजे २ मे २०२५ रोजी दर्शनासाठी खुले करण्यात आले आहेत. १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या केदारनाथच्या दर्शनासाठी लाखो भाविक या ठिकाणी येतात. अनेक शिवभक्तांचे हे ठिकाण अगदीच आवडीचे आहे. त्यामुळे लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. केदारनाथ यात्रेला जाण्यासाठी भाविक अत्यंत प्रतीक्षा करावी लागते. कारण – या मंदिराचे द्वार हे केवळ वर्षातील सहा महिनेच दर्शनासाठी खुले केले जाते. तर आज अशाच एका वृद्ध शिवभक्तांचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे; ज्यामध्ये अनोख्या पद्धतीने शिवदर्शनासाठी दोघे गेले आहेत.
केदारनाथ मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी अनेक जण हेलिकॉप्टर, घोडेस्वारीचा वापर करत असतात. पण, भगवान शिव यांचे आशीर्वाद घेण्यासाठी कर्नाटकहून पायी चालत आलेल्या दोन वृद्ध भाविकांची गोष्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. ३ मार्च रोजी कर्नाटकातील गुलबर्गा येथून या दोन्ही वृद्ध भाविकांनी पदयात्रेला सुरुवात केली. पण, केवळ ६० दिवसांत त्यांचा प्रवास पूर्ण करून १ मे रोजी केदारनाथला पोहोचले.
शिवा राजस्थानी यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता सुंदर सजवलेल्या केदारनाथ मंदिरासमोर हे दोन्ही वृद्ध भाविक रेनकोट घालून उभे आहेत. यापैकी एकाने सिल्व्हर रंगाचा रेनकोट घातला आहे आणि हातात लाकडी काठी पकडून, हात जोडून कन्टेन्ट क्रिएटरशी बोलत आहेत बोलत आहेत. या वृद्ध भाविकाचे वय वर्ष ७० आहे आणि या वयात त्यांनी केवळ ६० दिवसांत, पायी चकीत केदारनाथला पोहचले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या भक्तांचा व्हिडीओ बघाच…
व्हिडीओ नक्की बघा…
याला म्हणतात भक्ती,कोणतेही फॅन्सी फोटो नसलेली (Viral Video)
व्हिडीओत व्लॉगर, आजोबांची ओळख करून देत सांगतो की, मित्रांनो, केदारनाथ धाम येथे दोन आजोबा आले आहेत. पुढे काही सांगण्याअगोदर ७० वर्षीय आजोबा म्हणून लागले “आम्ही कर्नाटकहून पायी आलो आहोत. आज आमचा ६० वा दिवस आहे. आम्हाला वाटले होते की, ७५ दिवस लागतील, पण आम्ही ते लवकर पूर्ण केले. हा आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे” … तर माहितीनुसार , गुलबर्गा आणि केदारनाथमधील अंतर रस्त्याने सुमारे २००० किलोमीटर आहे. इतके मोठे अंतर पायी चालणे ही एक अविश्वसनीय गोष्ट आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @shiva_rajasthan_121 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त करत “हर हर महादेव, आजोबांना प्रणाम”, “याला म्हणतात भक्ती,कोणतेही फॅन्सी फोटो नसलेली”, “मला त्या आजोबांमध्ये नंदी दिसला”, “सगळं ठीक आहे… पण ७० वयात ६० दिवस चालणे हे ऐकून मला धक्का बसला”, “भोलेनाथ आणि त्यांचे भक्त” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत…