Viral Video Shows Humanity Still Alive : एखाद्याला संकटात मदत करणे हे एक चांगले काम समजले जाते. तुम्ही केलेली छोटीशी मदतही एखाद्याचे आयुष्य बदलू शकते किंवा त्याला जीवनदान सुद्धा मिळू शकते. त्यामुळे आपण जगत असतांना दुसऱ्याला जगायला मदत करणे हीच खरी मानवता आहे. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये गेटच्या फटीत एक पक्षी अडकलेला दिसतो आहे. या पक्ष्याला मदत करण्यासाठी एका व्यक्तीने मदतीचा हात पुढे केला आहे. नक्की काय घडलं बातमीतून सविस्तर जाणून घेऊ…

व्हायरल व्हिडीओ (Viral Video ) कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. पण, एका गार्डनच्या गेटच्या फटीत एक कावळा अडकलेला दिसतो आहे. कावळा फटीतून आपलं मान काढण्याचा प्रयत्न करत असतो. पण काही केल्या तो तिथून त्याचे मान काढू शकत नाही. हे तेथे उपस्थित एक अज्ञात व्यक्ती पाहते आणि कावळ्याची मदत करण्याचे ठरवते. व्यक्ती एक काठी घेऊन येते आणि नक्की पुढे काय करते , कावळ्याची मान सुखरूप बाहेर निघते का व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
first crop has entered the market increasing appeal of spicy papati in Uran
उरणच्या बाजारात वालाच्या शेंगा, वीकेंडला रुचकर पोपटीचे बेत
People caught the leopard in bihar shocking video goes viral on social media
अरे जरा तरी दया दाखवा रे! बिबट्याचे दोन्ही पाय पकडले, गळा दाबला अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?
yavatmal manja throat cut
यवतमाळ : पतंगीचा जीवघेणा खेळ! नायलॉन मांजाने दुचाकीस्वाराचा गळा…
crocodile rescue Operation video
महाकाय मगरीचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन! व्यक्तीने मगरीचे तोंड बांधून खांद्यावर उचललं अन्…; पाहा धडकी भरवणारा VIDEO
Tiger attack on Man Viral Video
‘जेव्हा मृत्यू समोर दिसतो..’ वाघानं एका झडपेत व्यक्तीचा हात फाडला; जंगलातल्या लाइव्ह घटनेचा VIDEO पाहून धक्का बसेल

हेही वाचा…‘अभी ना जाओ छोड कर…’ भर पावसात नातवाला शाळेत सोडायला निघाले आजोबा; VIDEO पाहून नेटकरी झाले भावूक

व्हिडीओ नक्की बघा…

माणुसकी…

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, कावळ्याची मान गेटमध्ये अडकलेली पाहून व्यक्ती एक काठी घेऊन येते. ती काठी कावळ्याच्या खाली आडवी धरते. असे केल्यानंर कावळ्याचे पाय आपोआप त्या काठीवर येतात. व्यक्ती हळूहळू ती काठी वर सरकवत जाते, तसतसं कावळा सुद्धा वर जाऊ लागतो. हा जुगाड केल्यामुळे कावळ्याची मान गेटच्या फटीतून सुखरूप बाहेर काढली जाते आणि कावळा आकाशात उडून जातो. अशाप्रकारे कावळ्याला जीवनदान मिळते.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @zindagi.gulzar.h या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘कहीं का किया कहीं तो अवश्य मिलता है’ अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून व्यक्तीचे कौतुक करत आहेत तर काही जण कावळ्याला जीवनदान दिल्याबद्दल थँक यू म्हणताना दिसत आहे. याचबरोबर ‘आपण लोकांचं भलं केलं तर आपलं भलं होईल’, ‘माणुसकी’ ; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या पाहायला मिळत आहेत.

Story img Loader