Video Shows American Mom Toddler Speaking In Hindi : भारताच्या अनेक चालीरीती, परंपरा, संस्कृती परदेशांत अनेक जणांना आकर्षित करतात. परदेशांतील लोकांना भारतात येऊन या गोष्टींचा अनुभव घ्यायला आवडतं. काही दिवसांनी या सवयी अनेक जण आपलंसंसुद्धा करून घेतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. काही काळापासून भारतात राहणारी अमेरिकन कंटेंट क्रिएटर क्रिस्टन फिशर वारंवार सोशल मीडियावर तिच्या आयुष्यातील काही गोष्टी शेअर करीत असते. तर आज तिनं आपल्या चिमुकल्या बाळाची खास गोष्ट शेअर केली आहे.

अमेरिकन कंटेंट क्रिएटर क्रिस्टन फिशरनं, तिच्या चिमुकलीचा हिंदी बोलतानाचा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओची सुरुवातीला लहान मुलीनं पाणी मागितलं. त्यानंतर ती आईला खेळण्यांचा डबा उघडण्याची विनंती करते आणि म्हणते मम्मी, हे उघडून दे, काय झालं आदी अनेक शब्द ती सहज हिंदीमध्ये बोलताना दिसते आहे, जे पाहून तिच्या आईलादेखील आश्चर्य वाटलं आणि तिनं हा प्रसंग मोबाईलमध्ये शूट करून घेतला. कशा प्रकारे अमेरिकन कंटेंट क्रिएटरचं बाळ भारतीय भाषेमध्ये बोलतं आहे एकदा बघाच…

व्हिडीओ नक्की बघा…

भाषा ऐकून आईसुद्धा थक्क झाली

अनेकदा आपण काही दिवसांसाठी किंवा महिन्यांसाठी एका ठिकाणी स्थायिक झालो की, तिथली भाषा आपण शिकतो आणि तसेच बोलण्यास सुरुवात करतो. तेथील राहणीमानही आपण स्वीकारतो. असंच काहीसं अमेरिकन कंटेंट क्रिएटर क्रिस्टन फिशरच्या बाळाबरोबरही झालं असावं. भारतात काही काळ राहिल्यावर तिचं बाळसुद्धा हिंदी भाषा बोलायला शिकलं आणि त्याची भाषा ऐकून आईसुद्धा थक्क झाली आणि तिनं या गोष्टीचा लहानसा व्हिडीओ बनवून इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ क्रिस्टननं @kristenfischer3 तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओला ‘माझी अमेरिकन मुलगी हिंदी बोलते आहे. तिला हिंदीमध्ये उत्तर द्यायचं कसं समजतं आहे यावरच माझा विश्वास बसत नाही आहे. ती जास्त बोलत नाही; पण ती हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषा मिक्स बोलते. ही छोटीशी मुलगी भारतात जन्मली होती आणि आता ती हळूहळू मोठी होत आहे’, अशी कॅप्शन दिली आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून या अमेरिकन बाळाचं कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाहीत.