Video Shows Rickshaw Driver Steal Money From Customer Purse : एकीकडे मेहनतीने कमावणारे तर दुसरीकडे चोऱ्यामाऱ्या करून इतरांना लुबाडणारी माणसे या जगात असतात. त्यातच पाकीटचोरी हा पैसे मिळविण्याचा एक सोपा मार्ग आहे, असे म्हणायला हरकत नाही. तर आज असाच काहीसा अनुभव मॉडेल आणि फॅशन डिझायनर जान्हवी क्षत्रियसने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे; ज्यामध्ये रॅपिडो रिक्षा चालकाने पर्समधून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला आहे असा तिने दावा केला आहे.

जान्हवीच्या म्हणण्यानुसार रिक्षाचालक प्रवासादरम्यान रिअर व्ह्यू कॅमेरातून तिच्याकडे बघत होता. त्यादरम्यान रिक्षा चालकाने प्रवास संपण्यापूर्वी पैसे देऊ शकते का असे. पण, जान्हवीच्या फोनची बॅटरी लो असल्यामुळे ते शक्य नव्हते. पण, जान्हवीचा संशय तेव्हा वाढला जेव्हा रिक्षाचालकाने तिच्या धर्माबद्दल विचारले. हनुमानाच्या एका मोठ्या पुतळ्याजवळून रिक्षा जात असताना जान्हवीने हात जोडल्यावर ‘तू हिंदू आहेस का’ असे सहज रिक्षाचालकाने विचारले. त्यावर जान्हवीने हो असे उत्तर दिले. त्यावर रिक्षाचालक ‘तुझ्या चेहऱ्यावरून तू हिंदू आहेस असे वाटत नाही’ ; असे म्हणायला. पण हे ऐकूनही जान्हवीने शांत राहण्याचा निर्णय घेतला.

काही वेळाने जान्हवीने कॉफी घेण्यासाठी एका दुकानाजवळ रिक्षा थांबवण्यास सांगितली. दुकानातून परत आल्यावर तिने पाहिले की, रिक्षा चालक तिची हँडबॅग उघडून चोरी करण्याचा प्रयत्न करत होता. रिक्षा चालकाला हँडबॅगची पुढची चैन उघडून पैसे काढण्याचा प्रयत्न करत होता. पण, चैनमध्ये पैसे अडकले होते आणि जान्हवी त्याच्या मागे उभे राहून सगळ बघत होती. जेव्हा जान्हवीने रिक्षा चालकाला विचारले तेव्हा बाजूच्या एका मुलीला दोष देत ‘ती बॅग चोरण्याचा प्रयत्न करत होती. म्हणून मी मागे उचलून ठेवत होतो’. पण, जान्हवीने मुलीकडे विचारपूस केली आणि रिक्षा चालकाने नाव आणि नंबरप्लेटसह व्हिडीओ शेअर केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @janhavi_jaan_official आणि @updatesofbengaluru या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. जान्हवीने घडलेली सर्व घटना कॅप्शनमध्ये नमूद केली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, रॅपिडोने माफी मागितली आणि रिक्षा चालकाबद्दल चौकशी करण्याचे आश्वासन कंपनीने व्हिडीओच्या कमेंटमध्ये दिले आहे. तसेच नेटकऱ्यांनी रिक्षा चालकाबद्दल कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे.