Viral Video Of Construction Worker : कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. केर काढणाऱ्यांपासून ते अगदी कंपनीच्या मालकापर्यंत प्रत्येकाला दिवसभर मेहनत ही करावीच लागते. पण, तरी आपण अनेकदा इतरांच्या कामात किंवा नोकरीत किंवा व्यवसायात आनंद शोधतो किंवा स्वतःचे काम कमी लेखण्याचा प्रयत्न करतो. तर असे न करता एखादे काम पूर्ण करण्यासाठी कामाच्या स्वरुपाचा विचार न करता त्याचा आदर करणे महत्वाचे असते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ; ज्यामध्ये पोटासाठी काय काय करायला लागत याची छोटीशी झलक दाखवण्यात आली आहे.

बांधकाम कामगारांचे आयुष्य कसे असेल याचा अंदाज कोणी लावू शकत नाही. सकाळ पासून ते रात्री काळाकुट्ट काळोखात हे कामगार दिवसरात्र मेहनत घेत असतात. इजा होऊ नये म्हणून डोक्यावर हेल्मेट, हेल्मेटच्या पुढील भागावरही टॉर्च आणि युनिफॉर्म घातलेला असतो आणि याच गणवेशात त्यांना पूर्ण दिवस राहावे लागते. तर आज व्हायरल व्हिडीओत एका कामगाराला काम करताना प्रचंड तहान लागलेली असते. पण, तो सळ्यांनी पॅक असलेल्या बोगद्यात काम करत असतो.

हे खुर्चीत बसणाऱ्यांना काय कळणार (Viral Video)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, आपल्या बरोबर असणाऱ्या कामगाराला तहान लागलेली असते. म्हणून दुसरा कामगार पाण्याचे छोटे कॅन उचलून तहान लागलेल्या कामगाराजवळ नेतो आणि त्याला सळ्यांच्या मधून थोडी जागा असते तिथून थेट त्याच्या तोंडात कॅनद्वारे पाणी टाकतो आणि इथेच व्हिडीओचा शेवट होतो. तिथे उपस्थित एका अनोळखी माणसाने हे दृश्य पहिले आणि व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतला. उन्हातान्हात मेहनत घेणारे कामगार खाण्या-पिण्यासाठी सुद्धा एवढे जास्त घेतात हे पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

व्हिडीओ नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @official_vishwa_96k आणि @vishwa_creator या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये ‘पोटासाठी काय काय करायला लागत, हे खुर्चीत बसणाऱ्यांना काय कळणार… मनाला लागण्यासारख आहे पण खर आहे’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा हा व्हिडीओ पाहून भावुक झाले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिलेली गोष्ट खरी आहे असे कमेंटमध्ये सांगताना दिसत आहेत.