Video Shows Daughter Dance With Her Mother : घरात पाऊल टाकताच आई दिसली नाही की जीव कासावीस होतो, कारण चेहऱ्यावरून दिवस कसा गेला, भूक केव्हा लागली आहे, कोणती वस्तू कोणत्या वेळी हवी आहे हे न सांगता फक्त आईच ओळखू शकते; त्यामुळे बदलत्या काळानुसार आता लहानपणी आईला घाबरणारी मुले आता आईला त्यांची खास मैत्रीण समजू लागले आहेत. तर आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये लेक आणि आईने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला दिसतो आहे…
आज जगभरात दरवर्षी मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी ‘मदर्स डे’, अर्थात जागतिक मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचदरम्यान एका आईच्या डान्स व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अंजली ममगाईने आपल्या आईबरोबर ट्रेंडिंग ट्रॅक ‘डन विथ युअर एक्स’ या गाण्यावर डान्स केला आहे. अंजली कुर्ती-जीन्समध्ये आणि तिच्या आईने जांभळी साडी नेसली आहे.
तुमच्या जोडीने तर कमाल केली (Viral Video)
व्हिडीओची सुरुवात “नो एक्स्ट्रा स्ट्रेस, नो एक्स्ट्रा वरी (No extra stress, no extra worry) या गाण्याच्या ओळींनी होते. कॅज्युअल स्टेप्स आणि त्यांचा टाईमिंग एकदम बघण्याजोगा आहे. तुम्हाला एका क्षणासाठी वाटेल आई डान्स स्टेप्स चुकवेल. पण, व्हिडीओची सुरुवात होताच आईनेच सगळ्यात बेस्ट डान्स करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या वयात त्यांच्या परफेक्ट डान्स स्टेप्स, त्यांचा उत्साह, त्यांचे हावभाव तरुण मुलींना तोड देईल एवढं तर नक्की आहे. एकदा बघाच आई आणि लेकीचा हा डान्स व्हिडीओ.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @anjali.mamgai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘माझ्या आईपेक्षा कोणी कूल आहे का?’; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून आईचे भरभरून कौतुक करत आहेत आणि “तुम्ही दोघींनी हा ट्रेंड जिंकला आहे”, “तुमच्या जोडीने तर कमाल केली”, “काकूंनी खूपच जबरदस्त डान्स केला आहे”, तसेच अजीओच्या अधिकृत अकाउंटवरून “काकूंच्या शूजवर पाणी शिंपडा, कारण त्यांच्या स्टेप्सनी सोशल मीडियात आग लावली आहे”, अशी खास कमेंट आली आहे.