Viral Video Shows Man Makes Cleaning Easy With Desi Jugaad : घरात काम करायला लागली की, प्रत्येक जण काहीना काही उपाय शोधून काढून एकतर ते काम टाळतो किंवा मग ते काम मनोरंजक पद्धतीने कसे करता येईल याबद्दल विचार करायला लागतो. आईने भांडी घासायला लागली की, आपण कानात हेडफोन / इअरफोन घालून भांडी घासण्यास सुरुवात करतो. म्हणजेच कामाचा कंटाळाही येणार नाही आणि गाणी ऐकण्याचाही आनंदही घेता येईल. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये साफसफाई करण्यासाठी जबरदस्त जुगाड शोधून काढला आहे; जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
व्हायरल व्हिडीओत एक व्यक्ती फरशी साफ करते आहे. पण, एका हातात झाडू (खराटा) आणि दुसऱ्या हातात पाईप धरून त्याला स्वच्छता करणे कठीण जात असते. मग यासाठी तो एक जबरदस्त जुगाड शोधून काढतो. झाडूच्या मागच्या बाजूला तो बाटलीचा भाग जोडून ठेवतो. त्यानंतर कापून घेतलेल्या बाटलीमध्ये पाईप जोडतो. त्यानंतर पाण्याचा नळ चालू करतो. त्यामुळे पाईप झाडूत बाटलीच्या मदतीने अडकावल्यामुळे साफसफाई करणे आणखीन सोपे झाले आहे असे तुम्हाला दिसून येईल.
दादाकडे प्रत्येक प्रॉब्लेम्सवर उपाय आहे (Viral Video)
भारतात टॅलेंटची अजिबात कमी नाही. रात्री उरलेल्या भाज्यांपासून वेगवेगळे पदार्थ ते जुन्या वस्तूंपासून शोपीस आदी वेगवेगळे जुगाड आपल्यातील अनेक जण करत असतो. त्यामुळे भारतीय आणि देशी जुगाड यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते. आज व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, साफसफाई करण्यासाठी माणसाने जबरदस्त जुगाड केला आहे. झाडूला बाटली कापून त्यात अडकवली आणि त्याला पाईप जोडून साफसफाई करण्यास सुरुवात केली. एका हातात पाईप आणि दुसऱ्या हातात झाडू घेऊन साफसफाई करण्यापेक्षा हा जुगाड तरुणाला आणखीन सोपा वाटला. एकदा बघाच हा व्हायरल व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mr_umesh0018 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “नवीन जुगाड” ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा भारावून गेले आहेत आणि “जगातील सर्व शास्त्रज्ञ यापुढे फेल आहेत” , “ही आयडिया देशाच्या बाहेर जाता कामा नये”, “टेक्नोलॉजी आहे दादा टेक्नोलॉजी”, “दादाकडे प्रत्येक प्रॉब्लेम्सवर उपाय आहे” ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसत आहेत.