Video Shows Man Paints Wife’s Nails On Train : प्रेमाला वयाचे बंधन नसते असे म्हणतात. आपल्या जोडीदाराबरोबर दुःख, सुख शेअर करण्यापासून ते अगदी एकदुसऱ्याला छोट्या-छोट्या गोष्टीत न लाजता मदत करण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे प्रेम असते. आत्तापर्यंत तुम्ही प्रेम व्यक्त करणारे अनेक फोटो, व्हिडीओ पाहिले असतील. पण, आजचा व्हायरल व्हिडीओ तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद देऊन जाईल. कारण – आजच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत आजी-आजोबा एकमेकांबरोबर प्रेमळ क्षण घालवताना दिसत आहेत.
व्हायरल व्हिडीओ ट्रेन प्रवासाचा आहे. एक अज्ञात प्रवासी ट्रेनमधून प्रवास करत असतो. तसेच त्याच्या समोर असणाऱ्या सीटवर एक आजी-आजोबा बसलेले दिसत आहेत. ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान आजीला नेलपेंट लावायची असते. तर आजोबा आजीचा हात सीटवर ठेवून तिला नेलपेंट लावण्यास सुरुवात करतात. हा क्षण त्या अज्ञात प्रवाशाला खास वाटला आणि त्याने गुपचूप आपल्या मोबाईलमध्ये हा क्षण कॅप्चर करून घेतला आणि सोशल मीडियावर सगळ्यांबरोबर शेअर केला.
असाच लांबपर्यंत प्रवास करता आला पाहिजे (Viral Video)
अनेकदा असे म्हंटले जाते की, प्रेम हे एक आकर्षण आहे. त्यामुळे प्रेम बऱ्याचदा थोड्या काळासाठीच टिकते आणि नंतर कमी होते. पण, योग्य जोडीदार असला तर प्रेम ही एक खोल भावना आहे; जी काळानुसार वाढत जाते ; ज्याचे उत्तम उदाहरण व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळाले आहे. आजोबा आजीला नेलपेंट लावत असतात. पण, जणू काही आजोबांनी पहिल्यांदा आजीला हाताला स्पर्श केला आहे तसे आजीच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. एकदा बघाच हा प्रेमळ व्हिडीओ….
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @iamrohantamhane आणि @gauriavadhawkar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘प्रेम कधीच जुने होत नाही. कारण ते काळानुसार वाढत असते’; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून प्रेमात पडले आहेत आणि “मलाही तुझ्याबरोबर असाच लांबपर्यंत प्रवास करायचा आहे”, “खरं प्रेम वयानुसार वाढतं जातंय”, “प्रवास खूपच लांबचा आहे, सुंदर नाही तर समजूतदार निवड” ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत…