Viral Video Of Golden Retriever And Fruit Vendor : प्राण्यांमध्ये माणसांपेक्षा जास्त प्रेम असतं आणि त्यांना सुद्धा आपल्यासारखी प्रेमाची गरज असते. तुम्ही प्राण्यांवर जितकं प्रेम करालं त्यापेक्षा जास्त ते तुमच्यावर करतील. त्यामुळे वेळोवेळी हे प्रेम आपण त्यांना द्यायला हवं. तुम्ही एकदा का नकळत त्यांना गोंजारलं, त्यांना खाऊ घातलं की, त्यांनी दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी तुमची वाट बघितलीच म्हणून समजा. तर आज असंच काहीसे दृश्य दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एक हृदयस्पर्शी व्हिडीओ ज्यातून एक श्वान (गोल्डन रिटरिवर) आज प्रेक्षकांच्या घरोघरी व मनोमनी पोहचला आहे.

तुम्ही व्हायरल व्हिडीओमध्ये बघू शकता गोल्डन रिटरिवर घराच्या दारात कशाची तर वाट पाहत बसला आहे. काही वेळाने व्हिडीओ जसा पुढे जातो तसं गोल्डन रिटरिवरच्या दाराशी एक फळ विक्रेता हातगाडी घेऊन येतो. त्याला पाहिल्यानंतर श्वान आनंदाने शेपूट हलवून, जोरजोरात भुंकण्यास सुरुवात करतो. रोजच्या ठरलेल्या ग्राहकाला पाहून फळ विक्रेता गाडी थांबवतो आणि गाडीवरच केळं उचलून श्वानाच्या जवळ जातो.

दिवसाची सुरुवात अशी होते… (Viral Video)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, विक्रेता केळ्याचे छोटे-छोटे तुकडे करून श्वानाला भरवतो आणि खाऊन झाल्यावर श्वान गुपचूप घरात जातो. फळ विक्रेता दररोज सकाळी गोल्डन रिटरिवरला केळं भरवतो आणि श्वान सुद्धा दररोज बरोबर ठरविक वेळी विक्रेत्याची वाट बघत असतो आणि विक्रेता सुद्धा श्वानाला प्रेमाने रोज एक केळं देऊन जातो. एकाप्रकारे श्वान विक्रेत्याकडून टॅक्स वसूल करतो असे म्हणायला हरकत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ बघाच…

व्हिडीओ नक्की बघा…

View this post on Instagram

A post shared by Misty Eva Mauli (@misty_eva_mauli)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @misty_eva_mauli या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘आमच्या दिवसाची सुरुवात अशी होते’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “जर एखादा माणूस मनाने श्रीमंत असेल तर तो कुठेही आनंद शोधू शकतो”, “केळं खाल्यानंतर तो गुपचूप आतमध्ये गेला”, “एखाद्या माणसाप्रमाणे तो श्वानाला भरवतो आहे”; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत…