Viral Video Of Grandfather and Grandmother : प्रेम आहे म्हणून काळजी आणि काळजी आहे म्हणून प्रेम, यांच्यात एक बारीकशी रेष असते जी प्रेमात असलेल्या सगळ्यांनाच पाळता आली पाहिजे ती म्हणजे ‘मर्यादा.’ कारण या जगात प्रेमाचा, काळजीचा अतिरेक होताना दिसतो आहे. पूर्वीची मंडळीसुद्धा प्रेम करायची, पण त्यांनी कधी कोणत्या गोष्टीचा दिखावा केला नाही. पण, सध्याची मंडळी कधी रागाच्या तर कधी प्रेमाच्या तर कधी कधी केवळ धीटपणाच्या मर्यादा सोडून वागताना दिसतात. आपल्या आजूबाजूला कोण आहे, आपण कुठे आहोत याचा त्यांना पूर्ण विसर पडतो. तर आज सोशल मीडियावर मर्यादा काय असते हे सांगणारा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

व्हायरल व्हिडीओ एका आजी-आजोबांचा आहे. लग्नात फोटोग्राफर आजी-आजोबांचे फोटो काढत असतो. यादरम्यान तो त्यांना पोझ कशी द्यायची हे सुद्धा सांगत असतो. पोझ देताना आजीला आजोबांच्या खांद्यावर हात ठेवून डोकं टेकवायचे असते. पण, ही पोझ देण्यापूर्वी का कोणास ठाऊक आजी स्वतःच्या चप्पल बाजूला काढून ठेवते. त्यानंतर नवऱ्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि मग डोकं टेकावते आणि मग फोटोग्राफर त्यांचा सुंदर फोटो काढतो.

संस्कार जपणारी शेवटची पिढी (Viral Video)

नातं असलं तरी त्याला काही मर्यादा असतात आणि काही वेळा सध्याची मंडळी हे विसरून जातात. चॅटवर किंवा समोरून बोलताना, वागताना अगदी फिल्टर लावून जोडीदाराशी बोलतात. पण, या गावाकडच्या माणसांना बघा, ते आपल्या जोडीदारालासुद्धा परमेश्वर मानतात आणि त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी पायातील चप्पल काढतात. कोणताही दिखावा न करता नवऱ्याला असा मान सन्मान देणारी ही शेवटची पिढी असेल, असे म्हणायला हरकत नाही. एकदा बघाच हा अनोखा व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

View this post on Instagram

A post shared by ?_????_??|| (500k)? (@status_ktta_.official)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @status_ktta_.official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘मर्यादा काय असते ते बघा’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून भारावून गेले आणि “ही शेवटची पिढी साधी भोळी, नवऱ्याला देव मानला म्हणून चप्पल काढली पायातली”, “संस्कार जपणारी शेवटची पिढी”, “ही मर्यादा फक्त गावाकडच्या लोकांमध्येच आहे”, “पती हाच परमेश्वर असतो आणि त्या परमेश्वरासाठी तिने पायातली चप्पल काढली”; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.