Viral Video Shows Daughter Made Shirt For Dad : आई व लेकाचे आणि बाबा व लेकीचे प्रत्येक गोष्टीत जमते, असे अनेकदा आपण पाहत आलो आहोत. लेकाला ओरडा खाण्यापासून वाचवणारी आई आणि लेकीला फिरायला जाण्यासाठी आईकडून परवानगी मिळवून देणारे बाबा, असा हा त्यांचा एकमेकांना सावरून घेण्याचा प्रवास वर्षानुवर्षे सुरूच असतो. तरत आज सोशल मीडियावर असाच बाबा आणि लेकीचे प्रेम दाखविणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये रिक्षाचालक बाबाने इन्स्टाग्राम युजरलासुद्धा भावूक करून सोडले आहे.

@vaarunii_sreedhar इन्स्टाग्राम युजर प्रवास करण्यासाठी रिक्षा पकडते. सहसा चालकाच्या आवडी-निवडीनुसार रिक्षा सजवल्या जातात. बॉलीवूड ते अगदी ग्राहकांच्या सोईनुसार विविध गोष्टी रिक्षात दिसून येतात. पण, या रिक्षाचालकाने तर सगळ्यांची मने जिंकली. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रिक्षाचालक पाठमोरा दिसतो आहे. तसेच त्याने परिधान केलेल्या गणवेशावर, मागच्या साईडला त्याच्या लेकीने खास मेसेज लिहिलेला दिसतो. नक्की हा मेसेज काय आहे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा (Viral Video)…

हेही वाचा…‘लहान लहान पावले …’ आई-लेकाचा ‘तो’ VIDEO आनंद महिंद्रांनी केला शेअर, नववर्षात संकल्प करणाऱ्यांना उपाय सुचवत म्हणाले…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिले असेल की, रिक्षाचालक बाबांच्या शर्टाच्या मागे ‘आय लव्ह माय डॅड’ असे लिहिलेले असते. ही अक्षरे कोणत्या पेन किंवा स्केचपेनने नव्हे, तर धाग्याने शिवलेली असतात. लेकीने शर्टावर शिवलेल्या प्रेमाक्षरांची लाज न वाटू देता, बाबा अगदी अभिमानाने तो शर्ट घालून रिक्षा चालवण्यासाठी घराबाहेर पडतात. इन्स्टाग्राम युजर हे पाहते आणि मोबाईलमध्ये त्यांचा व्हिडीओ शूट करून घेते आणि सोशल मीडियावर शेअर करते, जो सध्या सगळ्यांची मने जिंकतो आहे, असे म्हणायला हरकत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे खरं प्रेम आहे…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @vaarunii_sreedhar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘त्याच्या मुलीने त्याच्यासाठी बनविलेला हा शर्ट त्याने किती अभिमानाने घातला आहे ते बघा. जीवनातील छोट्या गोष्टीही सर्वांत जास्त महत्त्वाच्या असतात’ असा मजकूर व्हिडीओला देण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “हे खरं प्रेम आहे, किती क्यूट व्हिडीओ आहे हा, खूपच मस्त, हृदयस्पर्शी’ आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.