Video Shows How To Make School Notebook : जून महिना सुरु झाला की, शाळेत जाण्याचे इच्छा होते. एकीकडे सुट्टी संपल्याचं दुःख तर दुसरीकडे वर्गातल्या मित्र मैत्रिणींना भेटण्याची, नव्या वर्गात, नव्या इयत्तेत जाऊन बसण्याचा उत्साह असतो. नवा वर्ग, नवे शिक्षक, नवे दप्तर, नवी वह्या-पुस्तके आणि रेनकोट घेण्याची उत्सुकताही शिगेला पोहचलेली असते. १५ जून तारीख जवळ आली की, ऑफिस, कॉलेजात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा पुन्हा शाळेत जाण्याची इच्छा होते बरोबर ना? तर आज शाळेच्या आठवणी पुन्हा जागं करणारा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

एखादी गोष्ट घडायला खूप वेळ लागते पण संपायला एक सेकंदही पुरेसा असतो. म्हणजेच १५० ते ४०० रुपयांची वही आपण काही सेकेंदात पैशांनी विकत घेतो आणि कधी कधी एका सेकेंदात त्याचे पान सुद्धा फाटते. पण, या वह्या बनवायला किती वेळ लागत असेल याचा अंदाजही आपण लावू शकत नाही. पण, आज व्हायरल व्हिडीओत तुम्हाला याचे प्रात्यक्षिक बघायला मिळेल. व्हायरल व्हिडीओत वही कशी बनवली जाते हे दाखवण्यात आले आहे. कागदाचा भल्यामोठा रोलचा काहीसा भाग मशीनमध्ये अडकवला आहे. त्यानंतर हळूहळू रोलमधून कागद मशीनमध्ये घेतला जातो आहे.

नव्याकोऱ्या वहीच्या पानांचा सुगंध काही वेगळाच असतो (Viral Video)

त्यानंतर काळा आणि लाल रंग एका दुसऱ्या मशीनमध्ये टाकला जातो आहे. त्यानंतर मशीनमध्ये टाकलेले रंग वहीवर रेषेच्या स्वरूपात प्रिंट होऊन येतात. त्यानंतर कामगार प्रत्येक प्रिंट झालेला कागद मापानुसार घडी करून ठेवतो. मग कव्हर घातले जाते. त्यानंतर दुसरा कामगार मशीनच्या सहाय्याने वह्यांची पाने आणि कव्हर जोडून घेतो. त्यानंतर उर्वरित भाग काढून टाकून वह्या दुकानात जाण्यासाठी तयार होतात. अशाप्रकारे शाळेच्या वह्या तयार होतात. कामगारांची मेहनत, वह्या बनवण्याची प्रक्रिया खूपच मोठी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mademechanism या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून चकित झाले आहेत आणि त्यांच्या शाळेतील आठवणी कमेंटमध्ये आवर्जून सांगताना दिसत आहेत. एक युजर म्हणतोय “तुला माहिती आहे का? शाळेच्या जीवनात पान बदलताना कागदाच्या कडा किती तीक्ष्ण होत्या, त्यामुळे बोट कापली सुद्धा जायची” , तर दुसरा म्हणतोय “नव्याकोऱ्या वहीच्या पानांचा सुगंध काही और होता” तर अनेक जण भावूक इमोजीसह त्यांच्या भावना सांगत आहेत ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.