Viral Video Shows Parents Love For Their Children’s : आई-वडिलांबरोबर राहण्यात खरा स्वर्ग आहे. पैसा, पद आई-वडिलांहून मोठे नाही. मात्र, आज लाखभर पैसे कमावणारेही वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात. असं असलं तरीही काही मोजके लोक आई-बाबांचे महत्त्व समजतात. एक दिवसाची पिकनिक असो किंवा तीन ते चार दिवसांसाठी कामानिमित्त बाहेर जायचं असो. आई व बाबा आपली बॅग भरण्यात नेहमी मदत करतात. आपण घराच्या बाहेर पडेपर्यंत त्यांचं छोट्या छोट्या वस्तू बॅगमध्ये ठेवणं सुरूच असतं. तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आई-बाबा लेकाची बॅग भरताना दिसत आहेत.

आई आणि बाबा त्यांच्या लेकाची बॅग भरत असतात. व्हायरल व्हिडीओच्या सुरुवातीला बेडवर बिस्किटांचे भरपूर पुडे आणि खायचे वेगवेगळे पदार्थ, तर घरी बनवलेले पदार्थ बरण्यांमध्ये भरलेले असतात. हे पाहून आई-बाबांचा लेक व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात करतो. प्रत्येक पिशवीत वेगवेगळे पदार्थ आई भरते आणि बाबा ते बॅगमध्ये व्यवस्थित ठेवण्यात मदत करत असतात. आई-बाबा त्यांचे मुलांवर असणारे प्रेम कसे व्यक्त करतात, व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) तुम्हीसुद्धा नक्की बघा…

if you sneeze frequently try these things and get benefits
Video : वारंवार शिंका येतात? हे खालील उपाय करून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
mother emotional video sad stories of elderly mother
“माझं कोणी नाही रडायला….” वृद्ध आईचे ते शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी; काळजाला भिडणारा VIDEO तुम्हाला काय वाटत?
Mom Dress up the dog with a hat and sweater
थंडीपासून संरक्षणासाठी जबरदस्त जुगाड! श्वानाला कानटोपी, स्वेटर घालून केले तयार; पाहा मजेशीर VIDEO
deadbodies founf in meerut
कुलूप असलेल्या घरात आढळले पाच मृतदेह, जोडप्याचा मृतदेह जमिनीवर, तर चिमुकल्यांचा बेडमध्ये; कुठे घडली भीषण घटना?
Anand Mahindra reacts to parent hack video
Anand Mahindra: अहो, थांबा! परदेशी नागरिकाचा ‘जुगाड’ पाहून आनंद महिंद्रा झाले थक्क; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाले, ‘आमचा मुकुट…’
Does Onion Juice really work for Stomach Aches
पोटदुखीपासून आराम मिळण्यासाठी खरंच कांद्याचा रस फायद्याचा आहे का? कुशा कपिलाने सांगितला वैयक्तिक अनुभव; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात?

हेही वाचा…​लक्षात राहणारी मैत्री… ! २३ वर्षानंतर रिक्रिएट केला क्षण, VIRAL VIDEO पाहून तुम्हालाही आठवतील बालपणीचे ते दिवस

व्हिडीओ नक्की बघा…

पालकांचं प्रेम

शिक्षण किंवा नोकरीसाठी अनेक जण घरापासून दूर राहतात. गणपती, दिवाळी, होळी, नाताळच्या सुट्टीदरम्यान ही लेकरं आपल्या घरी काही दिवसांसाठी येतात. मग अशावेळी सुट्टी संपली आणि पुन्हा ही लेकरं त्यांच्या हॉस्टेलवर जायला निघाली की, आई-बाबा अशाप्रकारे त्यांच्या आवडीनिवडीच्या वस्तू बॅगमध्ये भरण्यास सुरुवात करतात. ब्रशपासून ते अगदी खाण्यापिण्याच्या सामानापर्यंत सगळ्या वस्तू नीट ठेवल्या आहेत ना हे सुद्धा पाहतात आणि कोणत्या गोष्ट कमी पडणार नाही याची पुरेपूर काळजी घेतात.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @sushil._425 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘घरातून निघताना मुलांसाठी त्यांच्या आवडीच्या वस्तू बॅगमध्ये भरणे ही फक्त एक भावना नसून प्रत्येक पालकांचं प्रेम आहे’; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत. तर काही हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या घरच्यांची आठवण आली आहे, असे ते व्हिडीओच्या कमेंटमध्ये सांगताना दिसून आले आहेत.

Story img Loader