Viral Video Shows Unique Family Road Trip : सध्या अनेकांच्या बकेट लिस्टमध्ये रोड ट्रिपला जाण्याचा समावेश नक्कीच असतो. भटकंतीचं वेड असणाऱ्या आणि आपला भारत देशात कोणती ठिकाणे आहेत हे मनापासून बघायची इच्छा असणाऱ्यांसाठी रोड ट्रिप एकदम बेस्ट आहे. रोड ट्रिप म्हटल्यावर डोळ्यासमोर काही ठरावीक डेस्टिनेशन्स हमखास येतात. अशातच बुलेट घेऊन लडाखच्या वाळवंटातून फिरणं हा अनेकांचा सुट्टीचा ड्रीम प्लॅन आहे. तर केरळमधील एका कुटुंबाने रोड ट्रिपला एका वेगळ्याच पातळीवर नेले आहे.
संपूर्ण कुटुंब त्यांच्या यादीतील कोणत्याही ठिकाणी प्रवास करण्यासाठी एका आरामदायी कॅराव्हॅन तयार केली आहे आणि यावेळी त्यांनी लडाखला भेट देण्यासाठी त्यांच्या बॅग भरून ठेवल्या आहेत. कॅराव्हॅनमधून प्रवास करून, त्यांनी आतापर्यंत २२ भारतीय राज्ये बघितली आहेत. कॅराव्हॅन भारतबेंझ किंवा मर्सिडीज-बेंझ चेसिसवर आधारित असल्याचे दिसून आले, ज्यामध्ये कस्टम बॉडीवर्क आणि स्टायलिश हेडलाइट्स बसवण्यात आले आहे. ज्यामुळे चाकांवर घर बसवण्यात आले आहे असेच तुम्हाला वाटेल.
हे प्रत्येक ट्रॅव्हल करणाऱ्याचे स्वप्न आहे (Viral Video)
कॅराव्हॅन बाहेरून एक सामान्य बस सारखी दिसत असली तरीही आतून, ती एका आकर्षक चालत्या-फिरत्या घरात रूपांतरित केली आहे; ज्यामध्ये बेड, फ्रिज, स्वयंपाकघर अगदी सुंदर डिझाईनसह बनवण्यात आले आहेत. कुटुंब इन्स्टाग्रामआणि यूट्यूबवर त्यांच्या रोड ट्रिपचे अपडेट्स शेअर करून प्रवासाचे अनुभव ब्लॉगद्वारे शेअर करत असतात. तसेच युजर्सना त्यांच्या प्रवासादरम्यान बनवलेल्या घरगुती जेवणाची झलक दाखवतात. त्यांनी प्रवासात रेस्टॉरंटच्या जेवणावर अवलंबून न राहता चवदार मसाल्यांसह मांसाहारी पदार्थ बनवले कॅराव्हॅनमध्ये बसून घरगुती जेवणाचा आस्वाद घेतला.
व्हिडीओ बघण्यासाठी लिंकवर क्लिक करा…
https://www.instagram.com/reel/DJtRKn9TkXo/?igsh=MXpyaHBoYTcxcjVh
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @puthettutravelvlog या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून त्यांच्या भावना वेगेवेगळ्या शब्दांत कमेंटमध्ये व्यक्त करताना दिसत आहेत आणि “हे प्रत्येक ट्रॅव्हल करणाऱ्याचे स्वप्न आहे”, “खूपच सुंदर कल्पना आहे”, “तुमचा प्रवास सुरक्षित आणि आनंदी जावो”, “संपूर्ण कुटुंबाचे आणि विशेषतः या कुटुंबातील महिलांचे कौतुक करावेसे वाटते. मी आजच तुमच्या पेज फॉलो करायला सुरुवात केली. पुढील प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा”, “लडाख तुमची वाट बघत आहे”; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.