Little Girl made Get Ready With Me video : सध्या इन्स्टाग्रामवर ‘गेट रेडी विथ मी’ चे अनेक व्हिडीओ मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तयार होण्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओमध्ये कपडे, चप्पल, दागिने, लिपस्टिक, अगदी कपड्याने शोभेल असा मेकअप कसा करायचा याबद्दल व्हिडीओत सांगितले जाते. त्यामुळे हे बघून आपण सुद्धा असा व्हिडीओ एकदा तरी बनवला पाहिजे अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात एकदा तरी आली असलेलंच…

दिल्लीतील एका तीन वर्षांच्या मुलीने लग्नाला उपस्थित राहण्यासाठी कशाप्रकारे तयार झाली हे दाखवताना ‘गेट रेडी विथ मी’ (GRWM) व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओत तयार होण्याची एकेक स्टेप दाखवत ती लग्नासाठी तयार झाली. व्हिडीओच्या सुरुवातीला गुलाबी रंगाचा फ्रॉक घातलेली अक्षवी माथूरने सुरवातीला ‘मी लग्नाला जाण्यासाठी तयार होतेयं’ हे सांगून व्हिडीओत एकेक स्टेप्स म्हणजेच घागरा, बांगड्या, ओढणी, चप्पल आणि तिने केलेली हेअरस्टाईल व्हिडीओत दाखवली आहे.

सगळ्यात बेस्ट गेट रेडी विथ मी व्हिडीओ (Viral Video)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिली असेल की, अक्षवी माथूरने ‘गेट रेडी विथ मी’ (GRWM) चा खूप क्यूट व्हिडीओ शूट केला आहे. छोट्या फॅशनिस्टाने तिचा ब्लाउज दाखवला, लेहेंगा घालून झाल्यानंतर आनंदाने गिरक्या घेतल्या आणि रंगीबेरंगी बांगड्या, शोभेल असा दुपट्टा, सुंदर सँडल आणि छान हेअरस्टाईल करून तिचा लुक पूर्ण केला. यादरम्यान तिचे निरागसपणे बोलणे, तिचा हावभाव आणि घागरा घातल्यावर तिने आनंदाने घेतलेली गिरकी पाहून तुम्हीही नकळत तिच्या प्रेमात पडाल एवढे तर नक्की…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @themini_influencer या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून
नायकाने सुद्धा कमेंट केली आहे “तिला नजर लागू नये म्हणून कोणीतरी या गोंडस मुलीला काजळ लावा” , “सगळ्यात बेस्ट गेट रेडी विथ मी व्हिडीओ होता हा”, “प्रत्येकजण म्हणत आहे की, या मुलीला माहित आहे की, कपडे व्हिडीओसमोर न बदलता एकांतात बदलले पाहिजे. यासाठी एका नेटकाऱ्याने तिच्या पालकांचे आभार मानले.