Video Shows Girl Recreated Kiara Advani Met Gala outfit : यंदाचा ‘मेट गाला २०२५’ न्यूयॉर्क येथील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट येथे पार पडला. यावेळी बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी त्यांच्या एंट्रीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. अशातच बेबी बंपसह कियारा अडवाणीची मेट गालामध्ये धमाकेदार एण्ट्री झाली होती. यामध्ये बाळासाठी बनवलेल्या खास ड्रेसने सगळ्यांना प्रेमात पाडलं. सोनेरी आणि काळ्या या दोन रंगांचे सुंदर कॉम्बिनेशन असणारा तिचा ड्रेस, कुरळ्या केसांची हेअरस्टाईल, आणि पांढऱ्या रंगाची फ्लोईंग ट्रेल कॅरी केला होता.

कियारा अडवाणीच्या ड्रेसवर दोन हृदये आहेत. एक मोठं म्हणजे आईचं हृदय आणि तिच्या पोटावर असणारं लहानसं बाळाचं हृदय. हे दोन्ही हृदय (हार्ट) घुंगरू, स्टोन, मोती लावून एका साखळीने जोडली होती. म्हणजे आई आणि तिचं बाळ यांच्यातलं नातंच या ड्रेसमधून दाखवण्यात आले होते. याच दोन हृदयांना त्यांनी ‘Bravehearts’ म्हणून संबोधलं होतं, तसेच हा खास ड्रेस भारतातील फॅशन डिझायनर गौरव गुप्ता यांनी डिझाईन केला आहे. तर हाच लुक एका चिमुकलीने फक्त ३०० रुपयांत रिक्रिएट केला आहे.

एकदम बाहुली (Viral Video)

तर मुंबईच्या एका चिमुकलीने कियारा अडवाणीसागा ‘मेट गाला २०२५’ मधील हा लुक रिक्रिएट केला आहे. व्हिडीओच्या सुरवातीला चिमुकली गुनित तिच्या आईकडून पैसे घेते, दुकानात जाते आणि सोनेरी रंगाचे गिफ्ट पेपर खरेदी करते. त्यानंतर ती कियाराच्या मेट गाला गाऊनसाठी काळ्या रंगाचा कापड घेते आणि घरी येते. त्यानंतर सोनेरी रंगाचे गिफ्ट पेपर घेऊन दोन हृदये बनवते आणि सोनेरी रंगाच्या साखळीने जोडते. इतकेच नाही तर कियारा अडवाणी सारखे केस आणि मेकअप देखील हुबेहूब करते. तुम्हीसुद्धा बघा हा व्हायरल व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

View this post on Instagram

A post shared by Gunit Kaur (@gunit_banga)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @gunit_banga या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘कियारा अडवाणीला टॅग करीत तुला माझा लूक आवडला असेल, अशी आशा करते’,; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी चिमुकलीने रिक्रिएट केलेला लूक पाहून कौतुक करताना दिसत आहेत आणि “खूप गोड दिसतेस”, “एकदम बाहुली”, “डोळ्यांचा मेकअप खूप छान आहे. काय मेहनत घेतली आहे वाह” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.