Video Shows Ice Cream Making In Factory : जेवणानंतर कितीही पोट भरलेलं असूदेत आईस्क्रीम खाण्यासाठी प्रत्येकाच्या पोटात हक्काची जागा असतेच. त्यामुळे कोणीही आईस्क्रीम ऑफर केलं तरी आपण त्याला नाही म्हणत नाही. पण, अनेकदा पैसे वाचवण्यासाठी आपण स्वस्त कंपनीचे आईस्क्रीम विकत घेतो किंवा खातो. पण, असे करणे तुम्हालाही महागात पडू शकते. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये ५ रुपयांना मिळणारे आईस्क्रीम कशाप्रकारे बनवले जाते हे स्वतः च डॉक्टरांनी दाखवले आहे.

व्हायरल व्हिडीओ @Sheetal2242 डॉटर शीतल यादवने शेअर केला आहे. या व्हिडीओत एका छोट्या कारखान्यात आईस्क्रीम कसे बनवले जाते याची छोटी झलक दाखवण्यात आली आहे. सुरवातीला पांढऱ्या बादलीत नळाद्वारे पाणी ओतून या आईस्क्रीम बनवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. एवढंच नाही तर दोन निळ्या ड्रममध्ये फूड कलर मिसळून त्याला आईस्क्रीमच्या साच्यात ओतले जात आहे. त्यानंतर पाण्याने भरलेल्या भल्यामोठ्या टाकीत हे सगळे साचे क्रमाने लावून ठेवले आहेत.

अशा प्रकारे तयार होते तुमची ५ रुपयांची स्वस्त आईस्क्रीम (Viral Video)

त्यानंतर आईस्क्रीमच्या काड्या लावण्यात आल्या. थोड्या वेळाने आईस्क्रीम काढून एका बास्केटमध्ये ठेवून दिले आहे. त्यानंतर तयार आईस्क्रीम पॅक करून मार्केटमध्ये विक्री साठी पाठवले जात आहेत. ही सगळी प्रक्रिया करताना कोणतेही स्वछता, किंवा बनवताना कसलंही माप न घेता बनवली चालली आहेत; जे पाहून तुम्हाला पुन्हा कधीच आईस्क्रीम खाण्याची इच्छा होणार नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा कारखान्याचा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @Sheetal2242 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. डॉक्टरांनी कॅप्शनमध्ये “अशा प्रकारे तयार होते तुमची ५ रुपयांची स्वस्त आईस्क्रीम.पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही स्वस्त आइस्क्रीम खरेदी कराल तेव्हा हा व्हिडीओ नक्की बघा” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून महाग आईस्क्रीम कशी बनवते याचा सुद्धा व्हिडीओ दाखवा असं म्हणत आहेत तर अनेक जण आम्ही लहान असताना या आईस्क्रीमची चव चांगली असायची असे सुद्धा आवर्जून म्हणताना कमेंटमध्ये दिसत आहेत.