Viral Video Shows Rabbit and tortoise Race: परीक्षेचा अभ्यास आदल्या दिवशी करण्यापेक्षा शाळेच्या पहिल्या दिवसापासून रोज थोडा थोडा अभ्यास केला तर अभ्यासाचा ताण येत नाही आणि परीक्षेत अगदी चांगल्या गुणांनी पास सुद्धा होता येत. अशीच काहीसी ससा आणि कासवाची गोष्ट आहे. आपल्या चपळतेने ससा शर्यत जिंकायला जातो पण आपल्या अनुभवाने कासव ही शर्यत जिंकून जातो. चित्रकला स्पर्धेत एखादी गोष्ट कागदावर उतरवून काढ्याची असेल, लहान मुलांना झोपवताना एखादी सोपी गोष्ट सांगायची असेल किंवा एखादं गाणं म्हणायला शिकवायचं असेल तर आपण ‘ससा-कासवची गोष्ट’ हमखास सांगतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ; यामध्ये लहान मुलांनी ससा व कासवची पुन्हा एकदा शर्यत लावली आहे.

लहान मुल कोणता खेळ शोधून काढतील याचा काही नेम नाही. आज त्यांनी शर्यतीसाठी मैदान तयार केलं आहे. त्यांनी विटांच्या तीन उभ्या रांगा केल्या आहेत. दोन बाजूला दोन ससे व मध्ये एक कासव ठेवलं आहे. अशाप्रकारे त्यांच्या शर्यतीला सुरुवात होते. चिमुकली कासवाच्या बाजूने असते. तर चिमुकला ससा या प्राण्याच्या बाजूने असतो. बघता बघता यांची शर्यत सुरु होते. ससा प्राणी नेहमीप्रमाणे शर्यतीत पुढे असतो. नक्की कोण जिंकत ? पुन्हा कासव शर्यत जिंकतो का व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…Auto Driver: मुंबईत घर, व्यवसायाने एजंट तरीही छंद म्हणून चालवतात रिक्षा; तरुणीला गोष्ट सांगत दिला त्यांनी ‘हा’ सल्ला; पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

पुन्हा रंगली ससा-कासव स्पर्धा :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, विटांच्या तीन उभ्या रांगा करून दोन ससा व कासव यांची शर्यत रंगली आहे. शर्यतीला सुरुवात होते आणि ससा पुढे जातो. पण, जसं गोष्टीत झालं अगदी तसंच दोन्ही ससे अगदी पुढे जाऊन थांबतात. चिमुकला एका ससा या प्राण्याला खाण्याच्या गोष्टी दाखवतो. पण, तो काही पुढे येत नाही. यादरम्यान कासव हळूहळू चालत येऊन पुन्हा शर्यत जिंकतो आणि ‘ससा-कासव’ची शर्यत पुन्हा कासवच जिंकतो ; जे पाहून चिमुकली भरपूर खुश होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @iSarikaRathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘पुन्हा एकदा कासवाने शर्यत जिंकली’; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा हा व्हिडीओ पाहून मजेशीर कमेंट व्यक्त करताना दिसत आहेत, तर काही जण नेमही असं का घडतं, कदाचित ससा शर्यत करण्याच्या मूडमध्ये नसेल ; आदी अनेक कमेंट नेटकरी करताना दिसत आहेत. एकूणच ससा व कासवची शर्यत पुन्हा कासवाने जिंकली हे पाहून सगळ्यांनाच आनंद झाला आहे असे म्हणायला हरकत नाही.