Video Shows Man Celebrate Mother Birthday In Flight : वाढदिवस म्हंटला की, डेकोरेशन, पाहुणे, केक आदी अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतात. भरपूर्ण माणसांबरोबर वाढदिवस साजरा करण्यात आनंद काही निराळाच असतो. पण, नेहमीच वाढदिवसाला आपण घरीच असू हे शक्य नाही. त्यामुळे अनेक जण परिस्थिती, वेळ बघून वाढदिवस साजरा करतात आणि तो नकळत खास सुद्धा होऊन जातो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये ४०,००० फूट उंचीवर आपल्या आईचा वाढदिवस साजरा केला आहे.

बाली येथे जाणाऱ्या विमान प्रवासादरम्यान लेकाने आपल्या आईचा वाढदिवस साजरा केला. फिटनेस इन्फ्लुएंसर अभिनव गुप्ता आई-बाबांबरोबर विमान प्रवास करत असतो. यादरम्यान त्याच्या आईचा वाढदिवस सुद्धा असतो. त्यामुळे जमिनीपासून ४०,००० फूट उंचीवर विमानात आपल्या आईला लेक सरप्राईज देतो . या अभिनव एक लहान चॉकलेट पेस्ट्री बॉक्समधून काढून आईसमोर ठेवतो. बाबा आणि लेकाने हॅप्पी बर्थडेचे गाणे गात, टाळ्या वाजवत आईचा वाढदिवस साजरा केला आहे.

छोट्या गोष्टीने मोठा प्रसंग खास करता येतो (Viral Video)

आई ही अशी व्यक्ती आहे जिचे स्थान कधीच कोणी घेऊ शकत नाही. त्याचबरोबर,आईचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे सांगायचं झालं तर शब्दांची कमतरता जाणवू लागते. त्यामुळे आईचा वाढदिवस असेल तर तो खास झालाच पाहिजे. त्यासाठी व्हायरल व्हिडीओतील लेकाने सुद्धा अगदी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. लेकाने विमानात आईसाठी पेस्ट्री आणली होती. त्यानंतर लेकाने आणि बाबांनी मिळून आईसाठी गाणे म्हंटले आणि अगदी शेवटी लेकाने आईला मिठी मारली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @fit_abhinav या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “४०,००० फूट उंचीवर आईचा वाढदिवस साजरा करत आहे” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “भावाला प्रत्येक प्रसंग खास कसा बनवायचा हे माहित आहे”, “मुलं त्यांच्या आईच्या भरपूर क्लोज असतात” अशा कमेंट्स तर अनेक जण आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत.