Video Shows Student And Teacher Sweetest Reunion : शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं थोडं आंबट-गोड असतं. कौतुकाची थाप दिल्यावर आवडणाऱ्या बाई ओरडल्यावर मात्र वाईट होऊन जातात. त्यामुळे शिक्षकांना घाबरणारे आणि शिक्षकांचा अपमान किंवा त्यांना उलट बोलणारे, असे दोन गट असतात. पण, काही विद्यार्थी आणि शिक्षक असेसुद्धा असतात जे वर्षानुवर्षे एकमेकांना लक्षात ठेवतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे की त्यामध्ये आठ वर्षांनी एका विद्यार्थ्याला त्याचे शिक्षक दिसतात.
एक तरुण बाईकवरून कुठेतरी जात होता. तेव्हा त्याला रस्त्याच्या कडेला त्याचे शिक्षक दिसतात. वडाळा येथे आय.डब्ल्यू.एस. महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होऊन जवळजवळ आठ वर्षे झालेली असतात. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी शिक्षक दिसल्यानंतर तो तेथे थांबला आणि ‘कसे आहात सर’, असे म्हणाला. विद्यार्थ्याला पाहून शिक्षक, “अरे, तू तर रायडर झालास”, असे आश्चर्याने बोलतात. हातात ग्लोव्हज घातलेले पाहून “हातानेपण चालते गाडी”, असे अगदी मस्करीत म्हणतात. “सेफ्टीसाठी घातलेत सर”, असे विद्यार्थी म्हणतो. त्यावर शिक्षक “म्हणजे तुला विश्वास आहे की तू पडणार आहेस”, असा मजेशीर संवाद त्यांच्यात सुरू असतो.
त्यानंतर शिक्षक त्याच्या घरच्यांची विचारपूस करतात आणि विद्यार्थ्याकडे गो प्रो कॅमेरा असतो हे पाहून ‘मीपण यात दिसतोय का’ असेसुद्धा आवर्जून विचारतात आणि “आपणपण गो प्रो कॅमेरा घेऊया”, असे शिक्षक त्यांच्या मित्रांना सांगतात, खूप गप्पा मारतात आणि त्यानंतर मग दोघे एकमेकांचा निरोप घेतात. अनेक वर्षांनी भेटल्यानंतरही शिक्षकांनी दिलेला आदर पाहून विद्यार्थी खूश झाला आणि जुन्या आठवणींत रमून केला. त्यामुळे हा खास क्षण त्याने सोशल मीडियावर शेअर करून खास कॅप्शन लिहिली. काय कॅप्शन लिहिली आहे एकदा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
ते दिवस जेव्हा फक्त असाइनमेंटसह, गृहपाठ करावा लागत असे (Viral Video )
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @the_ronin_ride या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच तरुणाने, ‘वडाळा येथील एस.आय.डब्ल्यू.एस. महाविद्यालयात माझे शिक्षण पूर्ण करून जवळजवळ ८ वर्षे झाली आहेत. ते दिवस जेव्हा आम्हाला कामाची काळजी करावी लागत नव्हती आणि फक्त काही असाइनमेंटसह गृहपाठ करावा लागत असे. डबा खाण्याच्या सुटीत मित्रांबरोबर मजेदार गोष्टी, काही आनंदाचे क्षण, महाविद्यालयाच्या सुंदर आठवणींचा एक छोटासा भाग @su87raj हे आमचे सरसुद्धा होते. ते दिवस खरोखरच खूप हसवणारे होते. शिक्षक म्हणून तुमचे मार्गदर्शन ते तुमचे आमच्यावरील प्रेम हे अगदीच न विसरण्यासारखे आहे. तुम्हाला पुन्हा भेटून मला खूप आनंद झाला’, अशी खास कॅप्शन त्याने या खास भेटीला दिली आहे.