Viral Video Shows Students Eagerly Sharing What They Brought For Lunch : शाळा व शाळेच्या आठवणी सांगू तितक्या कमीच आहेत. शाळा सोडून कितीही वर्षं झाली तरी शाळेच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात कायम ताज्या असतात. शिक्षक, शाळेतील मित्र-मैत्रिणी, वार्षिक व क्रीडा महोत्सव आणि सगळ्यांची आवडती मधली सुट्टी यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. तर, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये चिमुकल्यांनी डब्यात काय आणलं यावरून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. नक्की कोणकोणते पदार्थ चिमुकल्यांनी आणले आहेत ते चला पाहूया.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) उत्तर प्रदेशातील रामपूरच्या हादी अकॅडमीमधील आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला एक अज्ञात व्यक्ती “सर्वांनी जेवणासाठी काय आणलं आहे?” असं विचारते आणि मग प्रत्येक चिमुकला डब्यात काय आणलं आहे, असं एकेक करून ते आपापले डबे दाखवायला सुरुवात करतात. फळांपासून ते अगदी पराठ्यांपर्यंत अनेक पदार्थ चिमुकल्यांनी डब्यात आणलेले असतात. पण, एका विद्यार्थ्यांच्या डब्यात जिलेबी पाहून नेटकऱ्यांनी मात्र त्याच्या आईला भेटायचं आहे, असं आवर्जून सांगितलं आहे.

हेही वाचा…बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड

व्हिडीओ नक्की बघा…

मुलांचा वेळ वाया घालवू नका…

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, प्रत्येक विद्यार्थी डब्यात काय आणलं ते बोलून दाखवतो. पहिली विद्यार्थिनी तिनं आणलेली पेरू, द्राक्षे ही फळं दाखवते, तर दुसरा चिमुकला ताज्या फळांपासून बनवलेला पिझ्झा, तर जवळपास निम्म्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पराठे आणले होते. मात्र, एका विद्यार्थ्याकडील जिलेबीच्या निवडीनं विशेष लक्ष वेधून घेतलं. त्यावर नेटकऱ्यांनी विनोदी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर, पराठा हा प्रत्येकाचा कसा आवडता आहे हेदेखील एका युजरनं कमेंटमध्ये नमूद केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @hadiacademyrampur या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘लंच टाईम’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओवर एका युजरनं कमेंट केली आहे, “२० मिनिटांचा लंच ब्रेक असतो. त्यातपण रील बनवून मुलांचा वेळ वाया घालवू नका.“ दुसरा म्हणतोय, “जिलेबी आणलेल्याला कोणीतरी पराठा द्या.” तिसरा म्हणतोय, “मुलाला जलेबी देणाऱ्या आईला भेटायचंय आहे” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.