Viral Video: सध्या पाळीव प्राणी म्हणून श्वान, मांजर पाळण्याकडे अनेकांचा कल आहे. वेगवेगळ्या प्रजातीचे श्वान आपल्याला पाहायला मिळतात. पण, आपला श्वान आज्ञाधारी, हुशार असावा असे प्रत्येकालाचं वाटते. त्यामुळे त्यांना प्रशिक्षण देणेही तितकेच गरजेचं असते. यासाठी पाळीव प्राण्यांचे पालक त्यांना वेगवेगळ्या प्रकारे हुशार बनविण्याचा प्रयत्न करतानाही दिसून येतात. तर आज सोशल मीडियावर असंच काहीस पाहायला मिळालं आहे. पाळीव प्राण्याचे पालक श्वानाला प्रशिक्षण देत असतात. पण, श्वान त्याचा उपयोग अगदीच मजेशीर गोष्टीसाठी करतो.

व्हायरल व्हिडीओ परदेशातला आहे. मांजर आणि श्वान या प्राण्यांना एका व्यक्तीने घरात पाळलेले असते. श्वान प्राण्याला राहण्यासाठी एक छोटंसं घर तयार केलेले असते. तर ज्याप्रमाणे आपण घराबाहेर जाताना घराचा दरवाजा बंद करतो. अगदी त्याचप्रमाणे श्वानाने बाहेर पडल्यानंतर स्वतःच्या छोट्याश्या घराचा दरवाजा कसा बंद करायचा याचे प्रशिक्षण मालकाकडून दिले जात आहे. श्वान मालकासमोर दरवाजा व्यवस्थित बंद करून दाखवतो. पण, मालक बाहेर जाताच एक मजेशीर गोष्ट करतो. नक्की श्वानाने काय केलं एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…काय सांगता? येथे चक्क प्रेशर कूकरच्या मदतीने बनवली जाते कॉफी; VIDEO पाहून तुम्हाला टेस्ट करायला आवडेल का सांगा ?

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, मालक बाहेर जाताचं श्वान एक खेळण घेऊन त्याच्या छोट्याश्या घरात जाऊन ठेवतो. त्यानंतर या खेळात बिचारी मांजर फसते. खेळण घ्यायला मांजर आतमध्ये जाते आणि तितक्यात श्वान पटकन दरवाजा बंद करतो आणि मांजर बिचारी आतमध्ये अडकून राहते व श्वान तेथून निघून जातो. मालकाने दिलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग श्वानाने अगदीच मजेशीर गोष्टीसाठी केलेला दिसून येत आहे. व्हिडीओ पाहून तुम्ही देखील पोट धरून हसाल एवढं तर नक्कीच.

श्वानाने घरात बंद करताच मांजर अगदी रागाने त्याच्याकडे पाहू लागली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ruby.the.labrador या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. श्वानासाठी खास इन्स्टाग्राम अकाउंट तयार करण्यात आले आहे. या अकाउंटवर तुम्हाला श्वान आणि त्यांच्या मालकाचे वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतील. व्हिडीओतील श्वानाची हुशारी पाहून नेटकरी सुद्धा चकित झाले आहेत आणि पोट धरून हसताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.