Viral Video Of vendor : माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत, असं म्हणणारे तुम्हाला बरेच जण सापडतील. काही जणांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ असा जॉब नकोसा वाटतो; तर काही जणांना व्यवसायातून कुटुंबासाठी वेळ काढणंही कठीण जातं. त्यामुळे बहुतेक लोकांचं असं म्हणणं असतं की, त्यांना दु:ख सहन करता येत नाही. त्यांना आयुष्यात फक्त सुख हवं असते. पण, खरी गोष्ट अशी की असे लोक सुख आणि दु:ख दोन्ही सहन करू शकत नाहीत. तसेच आजचा व्हायरल व्हिडीओ बघून असंही म्हणाल की, मला वाटतं तितकं माझं जगणं अवघड नाही.
व्हायरल व्हिडीओ फेरीवाल्याचा आहे. फेरीवाला आपल्या पोटा-पाण्यासाठी तारेवरची कसरत करताना दिसतो आहे. धावत्या ट्रेनमधून एक फेरीवाला उतरतो. उतरल्यानंतर त्याची टोपली ट्रेनमधून उतरवतो. विक्रीच्या वस्तूंनी भरलेली टोपली डोक्यावर सांभाळत जीव धोक्यात घालून, चालत रेल्वे ट्रॅक पार करतो आणि दुसऱ्या धावत्या ट्रेनपाशी जातो, तिथे टोपली ठेवतो यादरम्यान दोन्ही ट्रेनचा स्पीड कमी असतो. त्यामुळे फेरी विक्रेत्याला हे करणे सोपे पडते. फेरीवाल्याची ही तारेवरची कसरत व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
मजबूरी अशीच असते
९ ते ५ जॉब करणाऱ्या किंवा एखादं दुकान चालवणाऱ्या एका व्यक्तीला एका ठिकाणी बसून काम करावं लागतं; पण ट्रेनमधून छोट्या छोट्या वस्तू विकणाऱ्यांना मात्र व्हिडीओतील दृश्याप्रमाणे तारेवरची कसरत करावी लागते. ट्रेनमध्ये अगदी पाण्यापासून ते जेवणापर्यंत छोट्या छोट्या अनेकविध गोष्टी करणारे विक्रेते फिरत असतात. त्यांनाही कोणती ट्रेन केव्हा येणार, कधी निघणार याची अचूक माहिती ठेवावी लागते. कारण- त्या ये-जा करणाऱ्या गाड्यांवरच त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न अवलंबून असतो. आज व्हायरल व्हिडीओतसुद्धा हेच दृश्य पाहायला मिळाले आहे. अगदी जीव धोक्यात घालून फेरीवाला ट्रेनमध्ये चढ-उतार करतो आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @suraj_patel_jj या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘आणि तुम्हा लोकांना वाटतं की, तुमचं जगणं अवघड आहे…’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि दादा, पैसे कमवणे एवढे सोपे नाही आहे, “मजबुरी अशीच असते; बाकी पोटाचा प्रश्न आहे, म्हणून आपण त्यांच्याकडून वस्तू, अन्न विकत घेतले पाहिजे आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.