बेरोजगारी ही भारतातील एक गंभीर समस्या आहे, जी देशाच्या आर्थिक क्षेत्रासमोर महत्त्वपूर्ण आव्हाने उभी करत आहे. विविध क्षेत्रात सक्रिय असलेले जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राष्ट्र म्हणून भारत ओळखला जातो. पण बेरोजगारीच्या दरातील चढउतारांचा भारताच्या प्रगती आणि विकासावर गंभीर परिणाम होत आहे. अलीकडेच, पुणे, हिंजवडी येथील कॉग्निझंट वॉक-इन ड्राइव्हमध्ये फक्त एक रिक्त जागेसाठी हजारो लोक नोकरीचा अर्ज घेऊन आले. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये अनेक लोक नोकरीसाठी रांगेत उभे असल्याचे दिसते. बेरोजगारीचे चित्र स्पष्ट करणारा हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

व्हिडीओ इंस्टाग्रामवर job4software’s नावाच्या प्रोफाइलवर शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये पुणे, हिंजवडी येथील कॉग्निझंट वॉक-इन ड्राइव्हसाठी आलेल्या लोकांची गर्दी दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसते आहे की, भर उन्हात नोकरीसाठी अर्ज घेऊन अनेक लोक उभे आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या माहितीनुसार,”ज्युनिअर डेव्हलपर पोस्टसाठी आले २९०० पेक्षा जास्त रेझ्युमी गोळा करण्यात आले आहेत”

हेही वाचा – Pune : प्रेमात पडण्यासारखंच आहे पुणे! तुम्हालाही पुण्याचं वेड लागेल, एकदा हा व्हायरल VIDEO पाहाच

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओला सहा दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत व्हिडीओवर विविध प्रकारच्या कमेंट लोक पोस्ट करत आहे. काही लोकांनी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या पात्रतेबाबत प्रश्न उपस्थित केला तर वॉक -इन इंटरव्ह्यू बाबतचा आपला अनुभव सांगितला. कमी विकसित राज्यामध्ये जास्त लोकसंख्या आणि बेरोजगारीच्या आव्हानांचा सामाना करावा लागत आहे हे अनेकांनी अधोरेखित केले. तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.

हेही वाचा – बाथरूम साफसफाईसाठी चक्क रोबोट, VIDEO पाहून आनंद महिंद्राही झाले चकित; म्हणाले, “आम्हाला याची गरज…”

एकाने कमेंटमध्ये लिहिले की, “इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सचे दुःखद वास्तव.”

दुसऱ्याने, आपल्याकडे तांत्रिक प्रगती (echnological advancements) असूनही नोकरीसाठी लोकांची रांग पाहून निराशा होत व्यक्त केली. त्यांनी पारंपारिक नोकरीसाठी अर्ज करण्याच्या पद्धतींवर सतत अवलंबून राहण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि असे सुचवले, “जेव्हा आपण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती केली आहे तेव्हा हे दृश्य पाहून वाईट वाटते. ऑनलाइन रेझ्यूमे घेतला असता. एटीएस उत्तीर्ण उमेदवार मुलाखतीसाठी पुढे जातात. आपल्याकडे झूम आणि गुगल मीट सारखे तंत्रज्ञान आहे, आपण ते का वापरत नाही?”

तिसऱ्याने म्हटले की, “हे हास्यास्पद आहे. आपण कुठे चाललो आहोत?”

ब्लूमबर्गच्या मते, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या आकडेवारीवर आधारित, भारताचा बेरोजगारीचा दर ऑक्टोबर २०२३ मध्ये १०.०९ % हो जो या दोन वर्षांमध्ये उच्चांकावर पोहोचला. जुलै-सप्टेंबर या कालावधीत बेरोजगारीचा उच्च दर हे देशातील करोना-संबंधित निर्बंधांच्या प्रदीर्घ प्रभावामुळे होते.

नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस (NSSO) च्या अलीकडील डेटा एकूण बेरोजगारीच्या दरात घट झाल्याचे सूचित करते.

हेही वाचा – Video : ‘राम आएंगे…’; जर्मन गायिकेने गायले श्री रामाचे भजन! पीएम मोदींनी केले कौतुक, म्हणाले,”सुरेल आवाज…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डिसेंबर २०२३ पर्यंत, शहरी भागात १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी बेरोजगारीचा दर सप्टेंबर तिमाहीत ६.६ % पर्यंत कमी झाला, जो एका वर्षापूर्वी ७.२% होता. हा सकारात्मक कल लिंग-आधारित बेरोजगारी दरांमध्ये देखील दिसून येतो. शहरी भागात १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांमध्ये, बेरोजगारीचा दर मागील वर्षीच्या याच तिमाहीत ९.४ वरून जुलै-सप्टेंबरमध्ये ८.६ % पर्यंत घसरला. त्याचप्रमाणे, पुरुषांमध्ये, शहरी भागातील बेरोजगारीचा दर जुलै-सप्टेंबर या कालावधीत सहा टक्क्यांपर्यंत घसरला, जो एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीत ६.६% होता.