Viral Video Shows Children Take Street Dog To The Hospital : रस्त्यावर भटकणारे प्राण्यांना त्यांच्या अन्न- पाण्याच्या शोधात दिवसभर भटकावे लागत असे. एवढेच नाही तर हे सगळं करता करता त्यांना इतरप्राण्यांपासून स्वतःचा बचाव देखील करायचा असतो. यादरम्यान अनेकदा त्यांच्या वाटणीचे अन्न दुसरे प्राणी घेऊन जातात. यादरम्यान त्यांच्या भांडण होऊन ते एकमेकांना जखमी देखील करतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये चिमुकले एका श्वानाची मदत करताना दिसले आहेत; जे पाहून तुमचेही मन भरून येईल.
व्हायरल व्हिडीओत दोन मुले रस्त्याच्या कडेने, घाईघाईने धावत जात असल्याचे दिसून आले आहे. एक ट्रॉली ओढत तर दुसरा ट्रॉलीला मागून धक्का देताना दिसतो आहे. तसेच या ट्रॉलीच्या आतमध्ये श्वान बसलेला दिसतो आहे. रस्त्यावरून जाणारा एक अज्ञात माणूस जेव्हा त्यांना विचारतो तेव्हा चिमुकला सांगतो की, नुकतेच श्वानाला घेऊन प्राण्यांच्या रुग्णालयातून घेऊन गेलो होतो. कारण – त्याला एका दुसऱ्या श्वानाने जखमी केलेले असते. त्यामुळे पुढच्या उपचारांसाठी परत त्याला घेऊन जायचे आहे. हे ऐकून अज्ञात माणूस पिवळ्या टी-शर्ट घातलेल्या मुलाच्या पाठीवर थाप देतो आणि दोघांना जाण्यास सांगतो.
हेच खरे हिरो आहेत (Viral Video)
व्हायरल व्हिडीओ नोएडाचा आहे. दोन मुले त्यांच्या श्वानाला प्राण्यांच्या रुग्णालयामध्ये घेऊन गेलेले असतात. कारण – त्यांच्या श्वानाला दुसऱ्या श्वानाने जखमी केलेले असते. अंगावर फाटके कपडे आणि पाय अनवाणी, कोणतीही गाडी किंवा पैसे जवळ नाही तरीही फक्त प्रेम आणि श्वानाच्या काळजीपोटी ते ट्रोलीत टाकून रुग्णालयात घेऊन जातात. भरउन्हात लेकरांची श्वानासाठी धडपड चाललेली पाहून अज्ञात व्यक्तीने त्यांचा व्हिडीओ शूट करून घेतला आणि नेमकं काय घडलं हे व्हिडीओच्यावर मजकुरात लिहिण्यात आले आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @streetdogsofbombay या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “त्या दोन मुलांकडे पैसा नाही, गाडी नाही, फक्त श्वानाबद्दल प्रेम आणि करुणा आहे. त्यांनी एकदाही विचार केला नाही किंवा दुसऱ्याच्या मदतीची वाट पाहिली नाही. हेच खरे हिरो आहेत. अशा प्रकारची दया आपल्याला आशा देऊन जाते” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्याने ‘इथेच पैशांची ताकद संपते आणि हृदयाची शक्ती सुरू होते’ ; अशी कमेंट केली आहे.