Viral Video : चहा, पाणीपुरी विक्रेत्यांच्या स्टॉलवर प्रचंड गर्दी असते. त्यामुळे एखाद्या विक्रेत्याला किंवा व्यापाऱ्याला पाहिलं की, आपसूकच मनात येतं की आपणही व्यवसाय करावा. महिन्याच्या पगारापेक्षा दिवसाला मिळणाऱ्या पगाराकडे सगळ्यांचे मन आकर्षित होतं. तर आज असंच काहीसं एका इन्फ्लुएन्सरच्या बाबतीत घडलं आहे. नोकरीपेक्षा स्टॉल तुम्हाला जास्त उत्पन्न मिळवून देऊ शकतो का, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा एका ब्लॉगरने निर्णय घेतला. नक्की काय घडलं, इन्फ्लुएन्सरने कोणता व्यवसाय केला? चला जाणून घेऊ या…

ब्लॉगर सकाळी चहाच्या स्टॉलवर जातो. तिथे जाऊन पांढरा सदरा, टोपी परिधान करतो. त्यानंतर चहा बनवण्यास सुरुवात करतो आणि म्हणतो की, ‘आज मी बघणार आहे की, चहा बनवून किती पैसे मिळतात? ‘ त्यानंतर तो स्टॉलच्या मालकासह चहा विकण्यास सुरुवात करतो. तर या स्टॉलवर एक कप चहाची किंमत १० रुपये होती. तर चहा विकण्यास सुरू केल्यानंतर पहिल्या दीड तासात त्यांनी ७५ कप विकले होते. मग दिवसभरात इन्फ्लुएन्सरने किती पैसे कमावले, व्हायरल व्हिडीओतून (Viral Video ) तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…VIRAL VIDEO : एकीकडे ट्रॅफिक जाम, तर दुसरीकडे ढोल-ताशांचा आवाज; तरुणी रिक्षातून उतरली अन्… पाहा पुढे काय घडलं?

व्हिडीओ नक्की बघा…

करिअरचा मार्ग बदलण्याची वेळ …

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, पहिल्या दीड तासात ७५ चहाचे कप विकल्यानंतर दुपारपर्यंत ही संख्या १६६ चहाच्या कपांपर्यंत पोहोचली. त्यानंतर थोडा वेळ कोणतेच ग्राहक आले नाहीत. पण, दुपारी ४ नंतर पुन्हा ग्राहक येण्यास सुरुवात झाली. शेवटी संध्याकाळी अनेक कप चहा विकल्यानंतर त्यांनी दिवसभरासाठी ३१७ कप विकून स्टॉल बंद केला; ज्याची दिवसभराची कमाई सुमारे ३,१५० रुपये होती. त्याचप्रमाणे महिनाभरात चहा विक्रेता १,१०,००० रुपये आणि एका वर्षासाठी सुमारे १२ ते १४ लाख रुपये आरामात कमवत असेल, असे ब्लॉगरने सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ sarthaksachdevva या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ (Video Viral) पाहून अनेक नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसले आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “बरं, करिअरचा मार्ग बदलण्याची वेळ आली आहे. दुसरा युजर म्हणतोय की, “मी अभ्यास करणार होतो, पण मी ही रील बघून ठेवून दिलं”, तर अन्य काही युजर्सनी त्यांच्या मित्रांनाही टॅग करून, एकत्र चहाचा स्टॉल सुरू करण्यास प्रोत्साहित केले आहे’; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.