Viral Video Shows Watchman Playing Basketball : जबाबदारी म्हणजे आपण स्वत:हून स्वीकारलेली एक गोष्ट असते. ही जबाबदारी अनेकदा आवडी-निवडी बाजूला ठेवून उचलावी लागते. जबाबदारी पूर्ण करताना समोर असलेल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा लागतो. पण, कधी कधी मनात या आवडी-निवडी आपसूकच जाग्या होतात किंवा एखाद्याला आपल्या मनातले स्वप्न बघताना पाहून तो क्षण काही वेळेसाठी का होईना एकदा जागवावासा वाटतो. तर आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये काही तरुण मंडळींना खेळताना पाहून अज्ञात व्यक्तीला त्याची आवड-निवड आठवली आहे.

व्हायरल व्हिडीओ एका सोसायटीमधील आहे. काही तरुण मंडळी बास्केटबॉल खेळताना दिसत आहेत. त्यादरम्यान तेथील वॉचमन हा खेळ पाहत असतो. त्यांनाही बास्केटबॉल खेळण्याची खूप आवड असते. पण, कदाचित कुटुंबाच्या पोटापाण्यासाठी त्यांना नोकरी करणे गरजेचे असते. त्यामुळे ते वॉचमनची नोकरी करीत असतात. तर यादरम्यान काही तरुण मंडळींना वॉचमनकाकांनाही बास्केटबॉल खेळता येते याबद्दल कल्पना असते. तर ही तरुण मंडळी त्यांना या खेळात सामील करून घेण्याचा विचार करतात.

आयुष्य कधी कधी अन्याय करते (Viral Video)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, वॉचमन हवेत उडी घेत, निशाणा साधून बास्केटमध्ये बॉल टाकताना दिसत आहेत. जे पाहून तरुण मंडळीसुद्धा त्यांना खेळण्याची संधी देतात. वॉचमन अनेकदा हवेत उडी घेऊन, अगदी लांब उभं राहून बास्केटमध्ये अचूक बॉल टाकतो आणि उपस्थित तरुण मंडळींना थक्क करून सोडतो. कधी कधी पॅशन आपली पैशांची गरज भागवू शकत नाही म्हणून आणि कुटुंबातील सदस्यांच्या पोटापाण्यासाठी आपल्याला नोकरी ही करावीच लागते हे आज व्हायरल व्हिडीओत पुन्हा दिसून आले.

व्हिडीओ नक्की बघा…

View this post on Instagram

A post shared by Podcast (@stay______strong__7)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @stay___strong_7 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘जेव्हा जबाबदारी पॅशनची जागा घेते’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा भावुक झाले आहेत आणि “प्रत्येक मध्यमवर्गीय मुलाची बाजू”, “या जगाला त्याची पर्वा नाही’, “ही परिस्थिती फक्त पुरुषांच्याच नाही तर महिलांच्या वाटेलासुद्धा येते”, “आयुष्य कधी कधी अन्याय करते” आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.