Viral Video: लहान मुलं कितीही निरागस असली तरीही ती कधी काय करामत करतील हे कोणीही सांगू शकत नाही. अनेकदा ते आई-वडिलांच्या नकळत अशा काही गोष्टी करतात की, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त होते. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एका चिमुकल्याने चक्क हातामध्ये साप पकडल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. सोशल मीडियावरील ट्रेंड सतत विविध गोष्टींमुळे बदलत असतो. कधी थरकाप उडवणारे व्हिडीओ, तर कधी आपले मनोरंजन करणारे व्हिडीओ सातत्याने आपल्या डोळ्यांसमोर येतात. बऱ्याचदा यावर असे काही व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यात नकळत घडलेल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एका चिमुकल्याचा असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात त्याने स्वतःच्या हाताने भल्या मोठ्या सापाला पकडले आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका रानमाळावर एक मुलगा सापाच्या शेपटीला धरून बसल्याचे दिसत आहे. यावेळी अचानक तिथे एक लहान मुलगा येतो, पटकन सापाला पकडण्याचा प्रयत्न करतो. तो सापाला पकडत असताना साप स्वतःला मुलाच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण, तो चिमुकला शेवटी सापाला घट्ट पकडून ठेवतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @12amnikk या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत १३ मिलियनहून अधिक व्ह्युज आणि एक मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “हा मुलगा खूप खतरनाक आहे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “बापरे! खूपच भयानक आहे.” तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “अंगावर काटा आला” तर आणखी एकाने लिहिलेय की, “डेंजर मुलगा आहे.”