Viral Video: कठीण परिस्थितीत केवळ मानवच नाही, तर भटक्या प्राण्यांनाही भीती वाटते. मानवाप्रमाणे भटक्या प्राण्यांनासुद्धा मदतीची गरज असते. तर अशा परिस्थितीत काही लोक भटक्या प्राण्यांबद्दल दया दाखविण्याचे धाडस करतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत तलाव ओलांडण्यासाठी एका भटक्या श्वानाला मदत करण्याचे धाडस एका व्यक्तीने दाखवले आहे.

एक छोटासा तलाव ओलांडण्यासाठी श्वान प्रयत्न करताना दिसत आहे. या पुलावरून पलीकडे जाण्यासाठी पूल म्हणून लाकडी धोकादायक फळी लावण्यात आली आहे. यादरम्यान श्वानाच्या चेहऱ्यावर भीती आणि गोंधळाचा भाव असतो. पण, श्वान कोणी आपल्याला मदत करील का याची वाट पाहत असतो. त्यादरम्यान, एक धाडसी तरुण पुढे येतो आणि तिथे अडकून पडलेल्या कुत्र्याला वाचविण्यासाठी रुंद फळीवर चालत जातो. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ.

हेही वाचा…VIDEO: व्यक्तीने दुचाकीवरून नेलं असं भलंमोठं कपाट; एका हाताने धरलं हँडल अन्… पाहा व्यक्तीचा जुगाड

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, तलाव ओलांडताना श्वानाची मदत करण्यासाठी एक माणूस पुढे येतो. तो पुलावरून चालण्यासाठी श्वानाला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, घाबरलेला कुत्रा मागे फिरतो. मग तो श्वानाला त्याच्या हातात उचलतो आणि सावधपणे लाकडी धोकादायक फळी पार करतो. व्हिडीओच्या शेवटी उड्या मारत, शेपूट हलवून श्वान त्याचे आभार मानतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @therightplaceforyoufoundation_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “येथे माणुसकीचा विजय झाला आहे”, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. श्वानाने त्या माणसाबद्दल दाखवलेली कृतज्ञता नेटकऱ्यांच्या हृदयाला स्पर्श करून गेली आहे. त्यामुळे नेटकरी या व्हिडीओचे विविध शब्दांत कौतुक करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत.