Funny Wildlife Moments Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत जंगली असो किंवा भटके प्राणी त्यांची प्रेमळ बाजू, शिकार करण्याची स्टाईल आपल्याला बघायला मिळते. पण, माणसांप्रमाणे जंगलातील आणि रस्त्यावर भटकणाऱ्या प्राण्यांच्या जीवनातही अनेक मजेशीर गोष्टी पण घडतच असतील ना? तर आज सोशल मीडियावर असाच काहीसा प्रसंग पाहायला मिळाले आहे; जे पाहून तुम्हाला एका क्षणाला तुम्हाला धडकी भरेल आणि दुसऱ्या क्षणाला तुम्ही पोट धरून देखील हसाल एवढे तर नक्की…
व्हायरल व्हिडीओ भारतातील आहे. एक बिबट्या एका अरुंद गल्लीत फिरताना दिसतो आहे. काही वेळाने अगदी वेगाने बिबट्या एका गल्लीत जाताना दिसतो . कदाचित मांजर गेली असे समजून रस्त्यावर भटकणारे नऊ श्वान बिबट्याच्या मागून धावत-पळत जातात. पण, अगदी काही सेकेंदात तो बिबट्या असल्याची जाणीव श्वानांच्या ग्रुपला होते. मग काय प्रत्येक श्वान जसा रस्ता भेटेल तसे पळायला सुरुवात करतात; जे पाहून तुम्हालाही काही क्षणासाठी धडकी भरली असेल. पण, श्वानांनी बिबट्याला पाहून ज्याप्रकारे पळ काढला आहे ते पाहून तुम्हाला हसू देखील येईल.
सगळे श्वान परत आले ना? (Viral Video)
तुम्हाला ‘भागम भाग’ चित्रपटातील मजेशीर सीन आठवतोय का? जिथे अक्षय कुमार काही माणसांपासून स्वतःला वाचवण्यासाठी रस्त्यावर पळत सुटतो. पण, जसं श्वान त्यांना घाबरवतो तेव्हा संपूर्ण ग्रुप पुन्हा उलट्या दिशेने धावू लागतो? असाच सीन श्वानांबरोबर घडलेला दिसतो आहे. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, मांजर म्हणून पळत गेलेले भटके श्वान बिबट्याला पाहून पुन्हा उलट्या दिशेने पळत सुटले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा बघाच…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हायरल व्हिडीओ @Arhantt_pvt या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये घडलेली घटना सविस्तर लिहिण्यात आली आहे. मात्र व्हिडीओ पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत. “हे दृश्य भागम भाग चित्रपटावरून प्रेरित आहे”, “सगळे श्वान परत आले ना”, “शेवटी असणाऱ्या पांढऱ्या श्वानाने काय पाहिलं सुद्धा नसेल. इतर पळाले म्हणून तो सुद्धा पळून गेला”; आदी अनेक मजेशीर कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओ केलेल्या दिसून आल्या आहेत…