Viral video: सोशल मीडियाच्या दुनियेत दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात.कधी एखादा व्हिडिओ पाहून पोट धरून हसू येतं,तर कधी एखादा प्रकार इतका गंभीर असतो की त्यावर वादळ उठतं. विशेष म्हणजे काही व्हिडिओ इतके धक्कादायक असतात की पाहणाऱ्याला त्यावर ताबडतोब प्रतिक्रिया द्यावीशी वाटते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. यात रस्त्यावरून जाताना घडलेली एक घटना पाहायला मिळते. या व्हिडिओची लोकांमध्ये खुप चर्चा सुरु असून प्रत्येकाने आपल्या नजरेतून त्याचा वेगळा अर्थ लावला आहे.

आता तुम्ही म्हणाल असं झालंय तरी काय? तर झालं असं की, विद्यार्थ्याने बाईकस्वाराला अश्लील इशारा केला. व्हिडिओमध्य तुम्ही पाहू शकता, शाळेत जाणारा एक मुलगा आपल्या बहिणीच्या गाडीवर मागे बसलेला आहे. रस्त्यावरून जाताना अचानक त्या मुलाने समोर येणाऱ्या बाईकस्वाराला अश्लील इशारा केला. हा प्रकार पाहून बाईकस्वाराला राग आला. त्याने त्या दोघांचा पाठलाग केला आणि रस्त्याच्या कडेला त्यांना थांबवलं. त्यानंतर थेट बहिणीला संपूर्ण प्रकार सांगितला. हे ऐकताच बहिणीचा संताप झाला. तिने भावाला रस्त्यावरच खडसावलं. ती म्हणाली “हे कसले प्रकार आहेत? हा कसला बिनडोकपणा? काही मर्यादा असतात. तू कुठून शिकतोयस या चुकीच्या सवयी? यानंतर तिने भावाला खडसावलं. यावेळी व्हिडिओत तिचा राग आणि भावाची घाबरलेली अवस्था स्पष्टपणे दिसते. हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आला असून त्याचा व्हिडिओ थेट सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर निऑन मॅन न्यूज या हँडलवर शेअर झालेल्या या व्हिडिओखाली नेटिझन्सनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलं “अल्पवयीन मुलगा अश्लील इशारे करतोय, गाडी चालवण्याची परवानगी नसलेली दोन मुलं दुचाकीवर फिरतायत आणि तेही चुकीच्या बाजूने… ” दुसरा म्हणाला “बहिणीने भावाला माफी मागायला का नाही लावली? तिच्या बोलण्यावरून वाटतं ती फक्त प्रसंग टाळत होती” आणखी एका युजरने प्रश्न केला “बहिणीचं कौतुक आहे की तिने भावाला रस्त्यावरच धडा शिकवला. पण स्वतःचं काय? परवानगी नसताना गाडी चालवणं हा गुन्हा नाही का? ” काहींनी थेट सुचवलं की, “अशा वागणुकीला एक जोरदार चापट हवी होती.” तर काहींनी मात्र पालकांवर लक्ष केंद्रित करत म्हटलं “अशा मुलांना योग्य वेळी कंट्रोल मध्ये आणणं आवश्यक आहे, नाही तर भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात.” दुसरीकडे काहींनी बाईकस्वाराच्या संयमाचं कौतुक केलं. संतापून वाद घालण्याऐवजी त्याने बहिणीला सांगून मुलाला शिस्तीत आणलं, हीच खरी मोठेपणाची गोष्ट असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं.