Viral Video: सामान्य कुटुंबातील महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी, घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींमध्येच व्यतीत होत असतो. त्यापलीकडे जाऊन त्यांना स्वतःला फार कमी वेळ मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. हल्ली अनेक शहरांमध्ये महिलांच्या मनोरंजनासाठी ‘होम मिनिस्टर’सारखे कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यात महिलांबरोबर विविध खेळ खेळले जातात. त्यांना विविध कला सादर करण्याची संधी दिली जाते. आता याच कार्यक्रमातील सासू-सुनेचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतोय.
सासू-सुनेच्या कधी तिखट, कधी गोड नात्याचे किस्से खऱ्या आयुष्यासह अनेक चित्रपट, मालिकांमधूनही आपण पाहत असतो. टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये अनेकदा सासू-सुनेचे सततचे वादविवाद पाहायला मिळतात. मालिकांमधील खट्याळ सासू किंवा सुनेप्रमाणे खऱ्या आयुष्यातही आपल्याला अशी सासू-सून भेटली, तर आपलं काय होईल, असा प्रश्न प्रत्येक महिलेला सतावत असतो. परंतु, कधी कधी एखाद्या महिलेला मुलीप्रमाणे प्रेम करणारी सून, तर एखाद्या सुनेला आईसारखी माया करणारी सासूदेखील भेटते. दरम्यान, आता सासू-सुनेचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आ, ज्यात चक्क सासू व सून एकमेकींना कडेवर उचलून घेताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ‘होम मिनिस्टर’च्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सासू आणि सुनांमध्ये एक खेळ घेण्यात आला. त्यावेळी सासू आणि सूनेला आळीपाळीने एकमेकींना कडेवर उचलून घेण्यास सांगण्यात आले. त्यावेळी बऱ्याच सुनांनी आपल्या सासूला कडेवर उचलून घेतले होते. त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @newhomeminister1 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत. एकानं लिहिलंय, “बरं झालं दादा, सासूला तर चान्स मिळायला सुनेच्या कडेवरती बसायला.” दुसऱ्यानं लिहिलंय, “एखादी रागानं मुद्दाम खाली पाडेल.” आणखी एकानं लिहिलंय, “हिला इंगा दाखवू नको.”