Viral Video Teacher Braids Students Hair : शाळांमध्ये विद्यार्थिनींना दोन वेण्या बांधणे बंधनकारक असायचे. त्यासाठी आई तेल लावून एकदम मस्त, घट्ट वेण्या बांधून शाळेत पाठवायची. पण, उठायला उशीर झाला किंवा आई एखाद्या दिवशी आजारी पडली की, मग दोन वेण्या बांधणे शक्य नसायचे. मग शाळेत गेल्यावर शिक्षकांकडून शिक्षा दिली जायची. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; जो पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. विद्यार्थिनीला शिक्षा देण्याएवजी, किंवा ओरडण्याऐवजी शिक्षकाने केलेली कृती मन जिंकते आहे.
व्हिडीओत एक पुरूष शिक्षक खुर्चीवर बसलेला दिसतो. त्यादरम्यान एक तरुणी त्याच्यासमोर येऊन उभी राहते. घरून येताना तिला दोन वेण्या बांधणे शक्य नव्हते किंवा मधल्या सुट्टीत खेळादरम्यान तिचे केस कदाचित सैल झाले असतील. पण, विद्यार्थिनीचे केस विस्कटलेले दिसत आहेत. मग शिक्षकाने हे पाहताच तिला ओरडण्याऐवजी किंवा तिला शिक्षा देण्याऐवजी त्यांनी स्वतः तिचे केस बांधायला सुरुवात केली. यादरम्यान उपस्थित एका दुसऱ्या शिक्षकाने या क्षणाचा व्हिडीओ बनवून पोस्ट केला आहे.
अशा शिक्षकांमुळे मुली समाजात सुरक्षित आहेत (Viral Video)
शिक्षक टेबलावर बसला, अतिशय काळजीपूर्वक आणि अगदी कौशल्याने, विद्यार्थिनीच्या केसाची वेणी बंधू लागला. यादरम्यान विद्यार्थिनी व्यवस्थित बसली आहे ना याची खात्री केली आणि स्वतःच्या शैक्षणिक कामातून वेळ काढून योग्यरित्या वेणी बांधून दिली. वेण्या आणखीन व्यवस्थित दिसण्यासाठी आवश्यक असलेल्या लाल रिबन देखील बांधल्या. वेण्या बांधून झाल्यावर शिक्षकाने विद्यार्थिनीला हळूवारपणे तिच्या जागेवर परत नेले. शिक्षक आणि विद्यार्थिनीचा व्हायरल व्हिडीओ एकदा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @tv1indialive या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “त्यांच्या घरी नक्कीच मुलगी असेल म्हणून त्यांना रिबीन बांधण्याचा अनुभव आहे”, “वडिलांसारखे शिक्षक”, “प्रत्येक मुलीमध्ये स्वतःची बहीण, मुलगी बघणे खरोखर खूप चांगले आहे”, “अशा प्रकारच्या शिक्षकांमुळे आणि पुरुषांमुळे मला विश्वास बसतो की माझी मुलगी समाजात सुरक्षित राहील,” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.