Video Shocking Struggle to Board Moving Train Goes Viral : सगळ्यांनाच असे वाटत असते की, आपल्याच आयुष्यात भरपूर संकट आहेत, सगळी दुःख आपल्याच वाटेला येतात. पण, जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात घराबाहेर पडता आणि आजूबाजूला पाहता तेव्हा तुम्हाला कळते की, आपण खरंच किती भाग्यवान आहोत. आपल्याला राहायला घर, खर्च भागवायला नोकरी आणि दोन वेळचे खायला जेवण सुद्धा आहे. पण, इतरांना या सगळ्याच गोष्टी मिळवण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. तर आज सोशल मीडियावर असेच काहीसे दृश्य दाखवणारा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
अनेकदा मुंबईत नोकरी करायला आलेली मंडळी सणांना आपापल्या गावी जातात. जर तुम्ही कधी ट्रेनने प्रवास केलात तर तुम्हाला कळेल की, किती लोकांकडे घरी जाण्यासाठी पुरेसे पैसेही नसतात त्याचबरोबर ट्रेनमध्ये चढण्यासाठी त्यांना जनरल डब्यात बसण्यासाठी सोडा चढण्यासाठी संघर्ष करावा लागतो. ट्रेन सुरू झाली तर काय होईल याची पर्वा न करता; फक्त आपण आणि घरच्यांसाठी आणलेलं सामान ट्रेनमध्ये सुखरूप चढवून घरी पोहचण्यासाठीची धडपड सुरु असते.
कुठेतरी पोहोचण्यासाठी, ट्रेन पकडण्यासाठी त्याच्यावर किती दबाव असेल (Viral Video)
आज असेच काहीसे दृश्य व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळाले आहे. अनेक जण गर्दीच्या, चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यातच एक अज्ञात दोन्ही हातात बॅग घेऊन चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसतो. आधीच अनेक प्रवासी ट्रेनच्या दरवाजावर उभे राहून लटकताना दिसत आहेत; त्यामुळे इतर कोणालाही त्यात चढणे अशक्य नसते. तरीही, आपला जीव धोक्यात घालून, तो माणूस आत जाण्याचा प्रयत्न करतो. एका प्रवाशाच्या मदतीने सुरवातीला तो सामान आतमध्ये पोहचवतो आणि त्यानंतर अगदी जीवाची बाजी लावून ट्रेनमध्ये चढतो.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @satirical_dhruv या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “सामान्य माणसाचे जीवन” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी “कुठेतरी पोहोचण्यासाठी त्या विशिष्ट ट्रेन पकडण्यासाठी त्याच्यावर किती दबाव असेल. आपल्या देशात लोकांना अशा प्रकारे संघर्ष करावा लागत आहे हे खूप दुःखद आहे”, ” सरकार सामान्य माणसाचा खरोखर विचार करत नाही. सत्तेत असलेले लोक विकास आणि कामगिरीबद्दल बढाई मारतात तर सामान्य माणसांच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले जाते हे एक दुःखद वास्तव आहे” तसेच काही जण “खरं सांगायचं तर ट्रेनची तिकिटे इतकी महाग नसतात की ती त्यांना परवडतील पण तरीही सामान्य भागात प्रवास करताना या संघर्षाला तोंड द्यावे लागेल” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.