Viral Video: हल्ली सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. ज्यातील काही व्हिडीओंमध्ये डान्स, गाणी, रील्स अशा विविध मनोरंजन करणाऱ्या गोष्टी असतात तर काही व्हिडीओंमध्ये सत्य घटना शेअर केल्या जातात. यामध्ये अपघात, मारामारी अशा अनेक घटना आपण पाहतो. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

दिवसेंदिवस समाजामध्ये गुन्हेगारी करणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. पुरुषच नाही तर महिलाही मोठमोठ्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असतात. शिवाय यातील काही महिला तर पोलिसांनी पकडल्यावर त्यांनाही घाबरत नाहीत. अनेकदा त्या पोलिसांनाच मारहाण करण्याचा प्रयत्न करतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काही पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पोलिस ठाण्यामध्ये एका आरोपी तरुणीला खुर्चीवर बसवण्यात आलं असून यावेळी तिच्या बाजूला काही महिला पोलिस उभ्या होत्या, यावेळी त्यातील एक महिला पोलिस तिला केलेल्या गुन्ह्याबद्दल प्रश्न विचारते. यावेळी ती तरुणी काहीही उत्तर न देता सरळ महिला पोलिसाच्या पोटावर लाथ मारते. तिने लाथ मारताच सर्व महिला पोलिस तरुणीला घेरतात आणि तिला मारायला सुरुवात करतात. त्यानंतर ती तरुणी दुसऱ्या महिला पोलिसालाही लाथ मारून तिचा गणवेश ओढण्याचा प्रयत्न करते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @gavthi_mungla_या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत सहा लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले असून यावर हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “पापा की परी… ते तुझ्या घरी… पोलिसांसाठी तू फक्त एक छपरी.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “महिला पोलिसपण तिला असं मारतात की जणू अंगणवाडीच्या बाई मारतायत”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “चांगली तुडवा म्हणजे बाकी शाहण्या होतील.”