सध्या भारतात लग्नसराई सुरु आहे. अशातच लग्नातील अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांनी इंटरनेटवर स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडीओ व्हायरल होताच नेटिझन्सचे जोरदार मनोरंजन होत असते. सध्या लग्नासंबंधीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. वधू-वरांचा एक विचित्र व्हिडीओ समोर आला आहे, या व्हिडीओमध्ये दिसणारी गोष्ट आपण कधीही पाहिली नसेल.

या व्हिडीओमध्ये वधू आणि वर त्यांच्या लग्नाच्या पोशाखात एकमेकांसोबत धावताना दिसत आहेत. आरके खान नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ बराच व्हायरल होऊ लागला आहे. व्हिडीओ क्लिपमध्ये नवविवाहित वधू आणि वर त्यांच्या लग्नाच्या पोशाखात गावाच्या रस्त्यावरून धावताना दिसत आहेत. वधू-वरासोबत इतर काही लोकही धावत आहेत. व्हिडीओ पाहिल्यावर अंदाज लावला जाऊ शकतो की वधू-वर कोणत्यातरी वाहनाच्या मागे धावत होते, जे त्यांना मागे सोडून पुढे निघून गेले आहे.

“कॅमेरामध्येच घुसून राहू का?” सततच्या व्हिडीओ शूटिंगला कंटाळलेल्या मुलाने वडिलांनाच धरलं धारेवर

तुम्हाला OK चा फुलफॉर्म माहित आहे का? जाणून घ्या यामागची रंजक तथ्ये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर लोक या व्हिडीओला खूप पसंत करत आहेत. इंस्टाग्रामवर rkkhan6549 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ अपलोड होताच लोकांना तो खूप आवडला. या व्हिडीओला आतापर्यंत १२ दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून साडे चार लाखांहून अधिक लोकांनाही हा व्हिडीओ लाइक केला आहे. इतर अनेक युजर्सनीही या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका यूजरने लिहिले की, ‘याला म्हणतात पळून जाऊन लग्न करणे.’