Viral Video: स्वतःची भूक भागविण्यासाठी लोक दिवस-रात्र कष्ट करतात. माणसांप्रमाणेच प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी काही ना काहीतरी करतात. अनेकदा जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक मिटविण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात बिबट्या हरणाची शिकार करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात अनेकदा प्राण्यांचे मजेशीर तर कधी थरारक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. हे व्हिडीओ क्षणात लाखो व्ह्युज मिळवतात. सध्या असाच एक जंगलातील व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक बिबट्या हरणाची शिकार करताना दिसत आहे. हा थरकाप उडवणारा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका बिबट्याला गवताळ प्रदेशात दूरवर उभे असलेले एक हरीण दिसते. हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावताना दिसत आहे. यावेळी बिबट्या आपल्याकडे येत असलेले दिसताच हरीणदेखील जीव तोडून धावते आणि स्वतःचा जीव वाचवण्यात यशस्वी होते.

हेही वाचा: श्वानाला झोप अनावर झाल्यानं बसल्या जागी केलं असं काही… VIDEO पाहून पोट धरून हसाल

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @naturee_xplore या अकाउंटवरून शेअर केला असून, त्यावर आतापर्यंत जवळपास दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि १० लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय यावर अनेक नेटकरीदेखील कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “बिबट्यापेक्षा हरीणही वेगात धावू शकते.” तर दुसऱ्याने लिहिलेय, “हरणाचे नशीब चांगले होते म्हणून ते वाचले.” तर तिसऱ्याने लिहिलेय, “परफेक्ट व्हिडीओ क्लिक केला आहे.” तर आणखी एकाने लिहिलेय, “बिबट्याच्या हातातून शिकार निसटली”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एका व्हिडीओत श्वानाची शिकार करणाऱ्या बिबट्याच्या हातातून शिकार निसटून गेल्याचे दिसले होते.