Viral Video: समाजमाध्यमांवर नेहमीच प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यात अनेकदा प्राण्यांचे मजेशीर, तर कधी थरारक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. हे व्हिडीओ क्षणभरात लाखो व्ह्युज मिळवतात. परंतु, त्यातील काही व्हिडीओ असे असतात, जे आपल्या विचारांच्या पलीकडचे असतात. अनेकदा हे पाहून आपल्या काळजाचा थरकाप उडतो. तर, अनेकदा ते पाहून आपल्याला गंमत वाटते. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुम्ही अवाक् व्हाल.

जंगलातील काही हिंस्र प्राणी शिकारीच्या शोधात मानवी वस्तीमध्ये शिरकाव करताना दिसतात. बऱ्याचदा शिकारीसाठी आलेले हे प्राणी आपली शिकार मिळवून जंगलात परत जातात. पण, अनेकदा मानवी वस्तीमध्ये त्यांच्याबरोबरच असं काहीतरी घडतं, ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एक बिबट्या कारच्या पुढील ग्रिलमध्ये अडकल्याचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. पण आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील बिबट्याबरोबर असं काहीतरी घडताना दिसत आहे, जे पाहून तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शिकारीच्या शोधात मानवी वस्तीत आलेला एक बिबट्या पाणी पिण्यासाठी एका कळशीत तोंड घालतो. पण, त्यानंतर त्याचे तोंड कळशीतच अडकते. कळशीमध्ये अडकलेले तोंड बाहेर काढण्यासाठी बिबट्या इकडे-तिकडे फिरतो; पण काही केल्या त्याची सुटका होत नाही. त्यानंतर काही लोक बिबट्याला घेऊन जातात आणि त्याचं तोंड कळशीतून बाहेर काढण्यासाठी त्याला मदत करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘आरारारा खतरनाक…’ चाळीतल्या महिलांचा झापुक झुपूक गाण्यावर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @wildanimalearth98 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत जवळपास लाखो व्ह्युज आणि ६० हून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय, “बापरे, तो कसा अडकला?” आणखी एकाने लिहिलेय, “शेवटी तो वाचला का?” आणखी एकाने लिहिलेय, “त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळाले.” आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “खूपच वाईट घटना; त्याने आतापर्यंत अनेक प्राण्यांची शिकार केली.”