Dance Viral Video: मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’, ‘सुसेकी’, ‘तौबा तौबा’ अशी अनेक भारतीय गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. या गाण्यांवर अनेकांनी रील्स बनवल्या असून सोशल मीडियावर अनेकांना या गाण्यांचे वेड लागले आहे. तसेच अनेकदा सोशल मीडियावर काही जुनी गाणी देखील खूप चर्चेत येतात. दरम्यान, सध्या ‘उई अम्मा’ हे गाणं खूप चर्चेत आहे. ज्यावर सोशल मीडियावरील अनेकजण रिल्स बनवताना दिसत आहेत. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एक चिमुकली या गाण्यावर डान्स करताना दिसतेय.

सोशल मीडियावर अनेक चांगल्या-वाईट घटनांचे व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. हल्ली अनेक युजर्स सोशल मीडियावर उत्तम दर्जाचे कंटेंट शेअर करतात. ज्यात सुंदर डान्स, संगीत, रेसिपी, लेखन अशा विविध गोष्टी आपल्याला पाहायला किंवा वाचायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही कौतुक कराल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली सध्या ट्रेंडिंग असलेल्या ‘उई अम्मा’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतेय. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल. सध्या तिचा हा डान्स सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by B Sheokhand (@barkat.arora)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @barkat.arora या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास चार मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि दोन लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “आमची सुंदर डान्सर” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “कमाल केलीस तू तर” तर तिसऱ्याने लिहिलंय की, “काय नाचते ही” तर आणखी अनेक युजर्स चिमुकलीचे कौतुक करताना दिसत आहेत.