Aaron Raphael Football: असं म्हणतात बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात हे बंगळुरूच्या पाच वर्षीय अॅरॉन राफेलच्या बाबत नक्कीच खरं आहे, फरक इतकाच की अॅरॉनचं भविष्य त्याच्या पायाने मैदानात जादू करून दाखवलं आहे. या चिमुकल्याचं टॅलेंट इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. इतकं की त्याने जर्मन फुटबॉल संघाचा माजी कर्णधार रिअल माद्रिदचा मिडफिल्डर टोनी क्रुस याला देखील आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. क्रूस याने राफेलला आपल्या प्रशिक्षण अकादमीमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. हर्ष गोयंका यांनी सुद्धा राफेलच्या भन्नाट शॉट्सचा व्हिडीओ शेअर करत हाच पुढील मेसी असणार आहे अशा शब्दात कौतुक केलं आहे.
क्रूसने दिलेल्या चॅलेंजप्रमाणे राफेलने फिरत्या टायरमध्ये बॉल मारून खेळायचा ट्रिक शॉट खेळात एक व्हिडीओ शेअर केला होता. या शॉटला आजवरचा सर्वोत्तम ट्रिक शॉट म्हणून गौरवण्यात आले आहे. 433, Sporf, BRFootball आणि इंडियन सुपर लीग सारख्या इतर सोशल मीडिया हँडलद्वारे सुद्धा राफेलचा व्हिडीओ अक्षरशः उचलून धरला आहे. या व्हिडिओनंतर अॅरॉनच्या इंस्टाग्रामवर २१, ००० फॉलोअर्स झाले असून, त्याच्या ट्रिक शॉटला 40 लाख व्ह्यूज आले आहेत. या व्हिडिओची दखल घेत त्याला टोनी क्रुससोबत एका सत्रासाठी प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे.
हर्ष गोयंका यांनी शेअर केलेल्या व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे यात अॅरॉन केवळ फुटबॉलमध्येच नाही तर सर्वच बाबतीत मेसीचा हुबेहूब फॉलोवर आहे. यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत आवर्जून पाहा. या व्हिडिओत अॅरॉनचा नटखटपणा सुद्धा नेटकऱ्यांना भलताच आवडला आहे. (Video: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अध्यक्षांनी भारतीय पत्रकाराचा फोन हिसकावला; चिडून म्हणाले तुम्ही भारतीय तर..)
हर्ष गोयंका ट्वीट
अॅरॉन हा इंडियन सुपर लीग संघ बेंगळुरू फुटबॉल स्कूल प्रोग्रामचा देखील एक भाग आहे. साधारणपणे साडेपाच वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटांसाठी राखीव असलेल्या, ISL संघाने या चिमुकल्याचे टॅलेंट पाहून कोणत्याही शुल्काशिवाय त्याला प्रशिक्षणात समाविष्ट केले.