Viral Video: सिंह जंगलाचा राजा असला तरी वाघसुद्धा काही कमी नाही. वाघाचेही जंगलात तेवढेच वर्चस्व असते. सिंहाप्रमाणेच वाघसुद्धा खतरनाक शिकारी आहे. वाघ आणि सिंह हे जंगलातील सर्वात सामर्थ्यशाली आणि ताकदवान प्राणी आहेत. वाघ आणि सिंह यांची जंगलात आपली अशी एक दहशत असते, त्यामुळे फार क्वचितच वाघ आणि सिंह एकमेकांसमोर येतात. असाच एक वाघ-सिंहाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हीही चकित व्हाल.
सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंतीला पडतात, तर काही व्हिडीओ भयानक हल्ल्याचे असतात. काहीही असले तरी लोकांना प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला आवडतात आणि ते शेअरदेखील करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन सिंह पिंजऱ्यात कैद असून पिंजऱ्याच्या बाहेर वाघ निवांत बसलेला आहे. यावेळी वाघाला पाहून सिंह आपल्या पंजाने त्याला डिवचतो. ज्यामुळे वाघ संपवतो आणि सिंहावर डरकाळी फोडतो. यावेळी वाघ आणि सिंहामध्ये चांगलाच राडा झाला असता परंतु मध्ये जाळी असल्यामुळे हे भांडण थांबले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
पाहा व्हिडीओ:
हा व्हायरल व्हिडीओ युट्यूबवरील @usamastigers9532 या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत आणि यावर अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. शिवाय अनेक नेटकरीही यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. यावर एका युजरने लिहिलंय की, “बापरे खूपच भयानक आहे हे दृश्य”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “दोघेही आक्रमक आहेत”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “यांची फायटिंग बघायला मजा आली असती”