ट्रेकिंग हा तरुणांच्या आवडीचा विषय. जेव्हा सुट्टी असेल तेव्हा किंवा अगदी कामातून वेळ काढुन अनेकजण ट्रेकिंगचे नियोजन करतात. निसर्गरम्य ठिकाणी, गड-किल्ल्यांवर, बर्फाळ प्रदेशात अशा ठिकाणी ट्रेकिंगला जाण्यास सर्वजण पसंती दर्शवतात. याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये थक्क करणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक ट्रेकर बर्फाळ प्रदेशात ट्रेकिंग करत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओत या ट्रेकरसह इतर कोणी दिसत नसल्याने, हा ट्रेकर एकटाच ट्रेकिंग करत असल्याचे समजते. अत्यंत कठीण असा हा ट्रेक आहे, बर्फात ग्रीपचा आधार घेत हा ट्रेकर वर जात असल्याचे दिसत आहे. पण बर्फ कठीण असल्याने ग्रीप घेण्यासाठी अडचण येत असताना, या ट्रेकरचा ग्रीपवरील हात निसटतो आणि पुढे काय होते पाहा.

आणखी वाचा- Video: गरीब मुलांना दुकानाबाहेर रोज टीव्ही पाहत असलेले पाहून दुकानदाराने केलेली कृती होतेय Viral

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा: चिमुकल्याने चक्क माकडांना केले खेळात सहभागी; हा खेळ पाहून नेटकरीही झाले अवाक, पाहा Viral Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्रीपवरील हात निसटल्यानंतर ट्रेकर वेगाने खाली पडत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे, पण मध्येच त्याच्या हातात असणारी ग्रीप बर्फात अडकते आणि तो खाली पडण्यापासून वाचतो. हा थक्क करणारा व्हिडीओ पाहुन नेटकरीही अवाक झाले आहेत. या व्हिडीओला ११ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.