Ceiling Fan Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक भन्नाट व्हिडीओ चांगलाच गाजत आहे. पहिल्याच नजरेत हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा उभा राहतो, कारण यात घराच्या पंख्यावर काहीतरी असं लटकलेलं दिसतंय की पाहणाऱ्याचा श्वास रोखला जातो. सामान्यतः पंख्यावर धूळ, जाळी किंवा क्वचित एखादा पतंग दिसतो. पण, या वेळी जरा वेगळंच घडलं. कारण पंख्यावर लटकलेलं दृश्य इतकं विचित्र आणि भीतीदायक होतं की पहिल्याच नजरेत अंगावर काटा आला. हालचाली इतक्या गूढ होत्या की पाहणाऱ्याला क्षणभर वाटलं हे भांडण आहे की एखादी गुपित क्रिया?

व्हिडीओमध्ये दिसतं की पंख्यावर दोन जिवंत प्राणी एकमेकांत इतके गुंतलेले आहेत की ते नक्की भांडतायत की एखाद्या वेगळ्याच कारणाने हालचाली करतायत, हे काही केल्या कळत नाही. त्यांची हालचाल विचित्र, धोकादायक आणि थरारक आहे.

व्हिडीओमध्ये दिसतं की, घराच्या छताला लटकलेल्या पंख्यावर दोन कोब्रा साप घट्ट चिकटलेले आहेत. त्यांच्या हालचाली इतक्या विचित्र आणि धोकादायक दिसतात की जरा वेळ पाहिलं तरी वाटतं ते भांडतायत की एखादी वेगळीच प्रक्रिया सुरू आहे? सध्या सोशल मीडियावर हा भन्नाट व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठा गदारोळ माजला आहे. नेटिझन्सना सर्वात मोठा प्रश्न पडला, “हे दोघं नेमकं काय करतायत?” कुणी म्हणालं, “हे दोघं तर मेटिंग करतायत!” तर कुणी भीती व्यक्त केली. “घरात असं दृश्य दिसलं असतं तर कुटुंबाने पळ काढला असता.” काहींनी तर थेट कमेंट केली की, “आता घरात पंखा सुरू करणंसुद्धा रिस्क आहे.”

तज्ज्ञांच्या मते, सापांचा प्रजनन हंगाम सुरू झाला की नर साप मादीजवळ येतो आणि तिला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. या वेळी दोन्ही साप एकमेकांच्या शरीरात गुंतून जातात. अनेकदा हे तासन्‌तास चालू शकते. पहिल्यांदा हे दृश्य पाहणाऱ्या माणसाला वाटतं की साप एकमेकांशी झुंज देतायत; पण खरं तर ती त्यांची नैसर्गिक प्रक्रिया असते.

तज्ज्ञ सांगतात की, धोक्याची गोष्ट म्हणजे या काळात साप अतिशय आक्रमक होतात, त्यामुळे त्यांच्या जवळ जाणं माणसासाठी घातक ठरू शकतं. तज्ज्ञ नेहमीच सांगतात, अशावेळी जर तुमच्या डोळ्यासमोर असा नजारा आला तर दूरून बघा, पण त्यांच्याजवळ जाण्याचा अजिबात प्रयत्न करू नका.

येथे पाहा व्हिडीओ

मात्र, व्हिडीओ पाहून काही नेटकरी विनोदही करताना दिसले. कुणी म्हणालं, “हा तर नेचरचा लाईव्ह शो आहे,” तर कुणी चिडवून लिहिलं, “आता घरात बसूनच वाईल्डलाईफ सफारीचा अनुभव मिळतोय.”