Viral Video: लहान मुलांचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहतो, ज्यात ती मुलं बिनधास्त स्टेजवर डान्स करताना किंवा गाणं गाताना, अभिनय सादर करताना दिसतात. चिमुकल्यांच्या या व्हिडीओंना लाखो व्ह्युज आणि लाइक्सही मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात दोन लहान मुली सुंदर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही त्या मुलींचं कौतुक करताना दिसत आहेत.

हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रति मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता अशाच दोन मुलांचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो खूप चर्चेत आला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कार्यक्रमामध्ये दोन लहान मुली ‘नारंगी मोसंबी” या जुन्या मराठी गाण्यावर डान्स करताना दिसतायत. यावेळी त्या दोघींनी नारंगी मोसंबी गाण्याला साजेल असा पोशाख केला आहे. एकीने नारंगी रंगाची नऊवारी साडी तर दुसरीने मोसंबी सारखी हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. शिवाय त्यांचा डान्सही खूप अप्रतिम आहे, नेटकरी दोघींचे खूप कौतुक करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @durva_z_15 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास ८ लाखांहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून हजारो लाइक्स मिळाले आहेत. तसेच अनेक जण या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एकानं लिहिलंय, “ह्याला बोलतात अस्सल लावणीचा ठसका”, दुसऱ्या व्यक्तीनं लिहिलंय, “९० च्या दशकातील नृत्य कलाकृती, अप्रतिम सादरीकरण.”